आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ED Arrested Madhya Pradesh CM Kamal Nath Nephew Ratul Puri In Bank Loan Fraud Case Of Rs 354 Crore

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या भाच्याला ईडीकडून अटक, 354 कोटींच्या बँक घोटाळ्याचे आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोजर बेअरचे माजी संचालक रतुल पुरी यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय (ईडी) कडून सोमवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. मोजर बेअर कंपनीचे संचालक असताना त्यांनी कथितरित्या 354 कोटी रुपयांचा बँक घोटाळा केला असे आरोप करण्यात आले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीनंतर सीबीआयने रविवारीच पुरी यांच्यासह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात ईडीने पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली.
 

सीएम कमलनाथ यांचे भाचे आहेत पुरी
रतुल पुरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आहेत. त्यांनी 2012 मध्ये मोजर बेअरच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीता पुरी संचालक मंडळाचे सदस्य आहेत. सीबीआयने दीपक आणि नीता यांच्यासह इतर दोन अधिकारी संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्या विरोधात सुद्धा खटला दाखल केला आहे. त्यांच्या सर्वच ठिकाणांवर धाड टाकून चौकशी सुद्धा करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...