आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनी लाँडरींगप्रकरणी ईडी समोर रॉबर्ट वढेरांची तिसर्‍यांदा हजेरी, आतापर्यंत 15 तास चौकशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मनी लाँडरींग केसमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांचे पती रॉबर्ट वढेरा शनिवारी तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचलनालय (ईडी) समोर हजर झाले. त्यापूर्वी एजन्सीने त्यांची दोन वेळा एकूण 15 तासांसाठी चौकशी केली आहे. असे समजले जात आहे की, ईडीचे अद्याप समाधान झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.


लंडनमधील मालमत्ता खरेदीचे प्रकरण 
ईडीने लंडनच्या ब्रायंस्टन स्क्वेअरमध्ये 19 लाख पौंड किमतीच्या एका संपत्तीच्या खरेदीप्रकरणी वढेरा यांच्या विरोधात प्रकरण दाखल केले आहे. त्यापूर्वी या प्रकरणी वढेरा यांचे सहकारी मनोज अरोरा यांना कोर्टाने 6 फेब्रुवारीपर्यंत अंतरीम जामीन दिला होता. 


 

बातम्या आणखी आहेत...