आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीने सी. शिवशंकरन यांच्याशी संबंधित 224 कोटींची संपत्ती केली सील 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दूरसंचार कंपनी एअरसेलचे माजी संचालक सी. शिवशंकरन यांच्याशी संबंधित कंपनीची २२४.६ कोटी रुपयांची संपत्ती सील केली आहे. आयडीबीआय बँकेच्या कथित स्वरूपातील सुमारे ४७० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात मनी लाँडरिंगचा तपास करत असलेल्या ईडीने ही कारवाई केली आहे. 


ईडीने सांगितले की, कॅरेबियन देश ब्रिटिश व्हर्जिन आयर्लंडमधील शिवा ग्रुप ऑफ कंपनीज आणि एक्सेल सनशाइन लिमिटेडच्या विरोधात पीएमएलएचमधील तरतुदीअंतर्गत संपत्ती सील करण्याची प्रोव्हिजनल ऑर्डर जारी केली आहे. यामध्ये चेन्नईच्या एमआरसी नगर आणि टी नगरमधील प्लॉट, म्युच्युअल फंड आणि बँक खात्यातील जमा रकमेचा समावेश आहे. 


सीबीआयने सी. शिवशंकरन आणि इतरांच्या विरोधात आयडीबीआय बँकेच्या चेन्नई शाखेच्या वतीने देण्यात आलेल्या ६.७ कोटी डॉलर (४७० कोटी रुपये) चे कर्ज फेडले नसल्याने मागील वर्षी एफआयआर दाखल केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...