आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडीकडून आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचरची 78 कोटींची संपत्ती जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोचरवर बँकेच्या सीईओ असताना व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी कर्जात गडबड करण्याचा आरोप आहे

नवी दिल्ली- ईडीने आयसीआयसीआयच्या माजी एमडी चंदा कोचरची 78 कोटींची संपत्ती जप्त केली. यात चंदा कोचरचे मुंबईमधील घर आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित इतर संपत्त्यांचा समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी याची माहिती दिली.ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोचरविरोधात मनी लॉन्डरिंगच्या पीएमएलए अंतर्गत कारवाईसाठी वॉरंट जारी केला होता. या अंतर्गत कोचरच्या मुंबईमधील फ्लॅट आणि त्यांच्या कुटुंबीयांची कंपनीचा समावेश आहे.

कोचर आणि धूतविरोधात मनी लॉन्डरिंगचे प्रकरण

आयसीआयसीआय बँकेकडून व्हिडिओकॉन समूहाला कर्ज देताना अनियमितता आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात ईडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचरविरोधात तपास करत आहे. व्हिडिओकॉन समूहाचे चेयरमॅन ब्रजमोहन धूतसह इतर लोक तपासाच्या भोवऱ्यात आले आहेत.

3,250 कोटी रुपयांच्या कर्जात गडबडी

चंदा कोचर सीईओ असताना, आयसीआयसीआय बँकने व्हिडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज देताना गडबडी केली होती. ईडीने फेब्रुवारी, 2019 मध्ये याप्रकरणी खटला दाखल केला होता.