• Home
  • Eddie Collins has searched all over Tucson in hopes of finding 2 year old Jenny

International Special / माझ्या हरवलेल्या श्वानाला शोधून द्या, घर आणि जमिनीसह वर्कशॉपही तुमच्या नावे करतो


अमेरीकेतल्या डॉग लव्हरचे भावनिक अपील

दिव्य मराठी वेब

Jul 21,2019 11:52:34 AM IST

टस्कन- अमेरिकेतील टस्कन शहरात राहणारे एडी कोलिन्स कुत्र्यावर खूप प्रेम करतात. तो मागील दोन महिन्यांपासून हरवला आहे आणि त्याला शोधून देणाऱ्यास ते आपली सगळी प्रॉपर्टी द्यायला तयार आहेत. एडीची पाळीव कुत्री चिहुआहुआ जेनी एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्यांनी सगळीकडे तिला शोधले, पण ती सापडली नाही. त्यानंतर तिला शोधून देणाऱ्यास आपली सगळी प्रॉपर्टी देण्याचे त्यांनी ठरवले. एडीने शहरात जेनीचे पोस्टर लावले आहेत आणि त्यात तिला शोधून देणाऱ्यास एक बेडरूम अपार्टमेंट, वर्कशॉप आणि प्लॉट बक्षीस म्हणून देण्याचे लिहीले आहे.

एडीने याबाबत सांगितले की, "मी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहे, तिला शोधून देणाऱ्यास मी एकही शब्द न विचारता सगळं काही देण्यास तयार आहे. तिच्याशिवाय आयुष्य जगणे खूप अवघड आहे." मागील 1 महिन्यांपासून सोशल मीडियावर "माय नेम इज जेनी" नावाने कॅम्पेन सुरू आहे. एडीला आशा आहे की, अशारितीने जेनी लवकर सापडेल.


पोस्टरमध्ये लिहीला भावनिक संदेश
शहरात जेनीच्या पोस्टरमध्ये लिहीले, "तुम्ही मला पाहीले का? माझे वडील मला शोधत आहेत. तुम्ही मला घरी परत जाण्यास मदत केली, तर माझे वडील तुम्हाला घर, प्लॉट सगळंकाही देतील. जर तुम्हाला माहित असेल की, मी कुठे आहे, तर प्लीज त्यांना सांगा आणि मला घरी जाण्यास मदत करा."


X
COMMENT