आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कालाय तस्मै नम:

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची अवस्था "ना घर का ना घाट का' अशी झाली आहे. एक सर्वसामान्य भाजी विक्रेता ते उपमुख्यमंत्री अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सामान्य शिवसैनिकांना संधी दिली, त्यात भुजबळांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. त्यांची बेदरकार वृत्ती आणि शरद पवारांनाही आव्हान देण्याचे धार्ष्ट्य गोत्यात येण्यास कारणीभूत ठरले. शिवसेनेची लफडी, कुलंगडी बाहेर काढण्यात अग्रेसर असणाऱ्या भुजबळांची अवस्था दयनीय बनली आहे. आता जेलमध्ये टाका, असे उद्वेगाने शरद पवार म्हणाले; पण अडीच हजार कोटींची मालमत्ता ते म्हणतात तशी बापजाद्यांपासून मिळालेली नसावी. चंद्रकांत खैरे यांच्यावर मालमत्ता जमवण्याचा आरोप करणाऱ्या भुजबळांवर नियतीनेच डाव उलटवला आहे.
> राजकिशोर वानखेडे, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...