Home | Editorial | Agralekh | Editorial article about Implant surgery

रोपणातील हलगर्जी (अग्रलेख)

दिव्य मराठी | Update - Sep 01, 2018, 08:28 AM IST

शरीरात नादुरुस्त झालेल्या पेशी व अवयवांजागी शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम घटकांच्या रोपणाचा शोध वैद्यकशास्त्राच्या प्रगतीती

 • Editorial article about Implant surgery

  शरीरात नादुरुस्त झालेल्या पेशी व अवयवांजागी शस्त्रक्रियेद्वारे कृत्रिम घटकांच्या रोपणाचा शोध वैद्यकशास्त्राच्या प्रगतीतील एक मैलाचा दगड होता. पण वैद्यक शाखेतल्या नवनवीन संशोधनामुळे व त्यासाठी जन्मास घातलेल्या महागड्या तंत्रज्ञानाने रोपण शस्त्रक्रिया हा पुढे एक मोठा बाजार झाला. रोपण शस्त्रक्रिया करणारे मोजकेच डॉक्टर, अशी शस्त्रक्रिया करणारी तुरळक रुग्णालये आणि रोपण शस्त्रक्रियेसाठीची औषधे व कृत्रिम साहित्य तयार करणाऱ्या मोजक्या औषध कंपन्या अशी सध्याची परिस्थिती आहे.


  अनेकदा रोपण शस्त्रक्रियेच्या यशापयशाबद्दल डॉक्टरला जबाबदार धरले जाते. पण रोपण शस्त्रक्रियेला आवश्यक असणारी औषधे, उपकरणांचा दर्जा याबद्दल फारशी माहिती उघडकीस येत नाही. विशेषत: उपकरणांचा दर्जा कसा आहे याबद्दल ठोस माहिती रुग्णापर्यंत जात नाही. रुग्णाला वेदना- त्रास झाल्यानंतर त्याचे निदान खोलवर केले जात नाही. पण काही दिवसांपूर्वी रोपण शस्त्रक्रियेसाठी उपकरणे तयार करणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन या बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या सहायक कंपनीचा एक हलगर्जीपणा उघडकीस आला. हा हलगर्जीपणा सरकारने चौकशी लावल्यामुळे कंपनीला मान्य करावा लागला. या कंपनीने देशभरात सुमारे ४७०० 'हिप रिप्लेसमेंट सिस्टिम'(कंबरेच्या सांध्याचे रोपण) विकले होते व या सर्व उपकरणांचा दर्जा अत्यंत खराब असल्याचे आढळून आले. ही रोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेनंतर शरीराला भयंकर वेदना होत असल्याची तक्रार केली आहे. रोपण शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी कंबरेत प्रचंड दुखणे, अजिबात चालता न येणे, हाडे ठिसूळ होणे व खराब कृत्रिम उपकरण शरीरात साठून राहिल्याने शरीराला इजा होणे, ते दुरुस्त करण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागणे अशा तक्रारी या रुग्णांच्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे तक्रारी करणाऱ्या रुग्णांमध्ये चाळिशीच्या आतील रुग्णांची संख्या अधिक आहे.


  २०१७ मध्ये केंद्रीय आरोग्य खात्याने या तक्रारीची गंभीर दखल घेत एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आर्टिक्युलर सरफेस रिप्लेसमेंट (एएसआर) एक्सएल अॅसेटाब्युलर सिस्टिम व एएसआर हिप रिसर्फेसिंग सिस्टिम या दोन सिस्टिम ४७०० भारतीय रुग्णांच्या 'हिप इम्प्लांट'मध्ये वापरल्या. पण या दोन सिस्टिम आंतरराष्ट्रीय बाजारातून २००६ मध्येच मागे घेतलेल्या होत्या. ज्या उपकरणांवर प्रश्नचिन्ह आहेत तीच उपकरणे रुग्णांच्या शरीरात वापरल्याने रुग्णांना वेदना होणे साहजिकच आहे. जेव्हा समितीने कंपनीकडे रेकॉर्डची मागणी केली तेव्हा १२१ गंभीर केसेसपैकी ४८ केसेस समितीपुढे ठेवल्या गेल्या. उरलेल्यांचे रेकॉर्ड मिळत नसल्याचे सांगण्यात आले. जॉन्सन अँड जॉन्सनच्या या हलगर्जीपणाबद्दल या कंपनीने प्रत्येक रुग्णाला २० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी सूचना समितीने केंद्र सरकारला केली आहे. चौकशी समितीला आढळून आलेली काही तथ्ये तर चक्रावणारी आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनची उपकरणे वापरलेल्या ३६०० रुग्णांची माहिती समितीला अद्याप मिळालेली नाही. समितीने १०१ रुग्णांना पत्रे पाठवली. त्यापैकी २२ जणांनी आम्हाला रोपण शस्त्रक्रियेचा त्रास झाल्याची कबुली दिली. काही रुग्णांनी त्यांच्या तीन शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. बहुसंख्य डॉक्टरांनी मौन बाळगले आहे. दोनच डॉक्टरांनी हे खराब उपकरणामुळे घडल्याचे समितीपुढे स्पष्ट केले.


  आपल्याकडे सार्वजनिक वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ, अनास्था, बेजबाबदारपणा आपणाला माहिती आहे. पण महागड्या शस्त्रक्रिया करणारी रुग्णालये व त्यांना उपकरणे-औषधे पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यातील साटेलोटे हे रुग्णाच्या मृत्यूशी थेट खेळणारे आहे. अनेक देश शस्त्रक्रियांच्या उपयुक्ततेबद्दल सावध असतात. ऑस्ट्रेलियाने २००४ मध्ये एएसआर उपकरण वापरण्यास परवानगी दिली होती, पण नंतर त्यांनी त्याच्यावर नियंत्रण आणले. पुढे एएसआरवर आंतरराष्ट्रीय पातळीवर शंका आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने २००९ मध्ये या उपकरणाच्या विक्रीवर बंदी घातली होती.


  अमेरिकेत अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेबाबत देखरेख ठेवली जाते व रुग्णांची सतत तपासणी केली जाते. आपल्याकडे २०१० मध्ये महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन खात्याकडे अशा शस्त्रक्रियेबद्दल एक गोपनीय तक्रार आली होती. त्यानंतर प्रशासनाने कंपनीविरोधात पोलिस तक्रार केली. २०१२ मध्ये अन्न व औषध प्रशासनाने सेंट्रल ड्रग्ज्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडे (सीडीएससीओ) कंपनीचा आयात परवाना रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर सीडीएससीओ उपकरणाचा आयात परवाना रद्द केला, पण तरीही या रोपण शस्त्रक्रिया बिनबोभाटपणे केल्या जात होत्या. दिलासा देणारी बाब अशी की, जैन मुनि तरुण सागर जी महाराज नहीं रहे, सुबह हुआ समाधिमरण; आज तीन बजे अंतिम संस्कार विधि या कंपनीने आपली चूक व हलगर्जीपणा मान्य केला. ही कंपनी किती भरपाई देते हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

Trending