आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इक्बाल मिर्चीप्रकरणात प्रफुल पटेलांना ईडीची नोटीस, 18 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय असलेल्या इक्बाल मिर्चीसोबत आर्थिक आणि जमीनीचे व्यवहार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना नोटीस जारी केली आहे. तसेच, येत्या 18 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पटेल यांच्या कुटुंबाकडून प्रमोटेट कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिडेट आणि मिर्ची कुटुंबात झालेल्या व्यवहाराचा तपास ईडी करत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे 'सीजे हाऊस'मध्ये दोन फ्लॅट आहेत. 2007 मध्ये 'सीजे हाऊस'च्या बांधकामासाठी एक करार झाला होता. त्यावर प्रफुल्ल पटेल यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, इक्बाल फरार झाला होता आणि त्याचा लंडनमध्ये 2013 मध्ये मृत्यू झाला. पटेल यांच्या कुटुंबाची मालकी असेलल्या कंपनीने मिलेनियम डेव्हलपर्सला मिर्ची कुटुंबाकडून दोन प्लॅट देण्यात आले होते. हो प्लॅट नेहरू प्लेनेटेरियमच्या समोर आहेत. याच ठिकाणी मिलेनियम डेव्हलपर्सने 15 मजली इमारत उभी केली आहे. त्याचे नाव 'सीजे हाऊस' असे ठेवण्यात आले आहे.मिर्ची कुटुंबासोबत व्यवहार केल्याची कबुली
दरम्यान, प्रफुल पटेल यांनी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबासोबत आर्थिक व्यवहार केल्याचे कबुल केले आहे. प्रफुल पलेट म्हणाले की, "हो मी मिर्ची परिवारासोबत आर्थिक व्यवहार केला. मी काहीही चुकीचे केलेले नाही. हा जो काही व्यवहार झाला तो कायदेशीररित्या झाला. इक्बाल मिर्ची ज्याच्याकडे प्रॉपर्टी होती, याचा आमच्याशी काही संबंध नाही. सगळी कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये आहेत. मिर्ची यांना 1999 मध्ये पासपोर्ट मिळाला, ते युएईला जाऊन आले. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करणे अवैध आहे असं नाही. ही फक्त पर्यायी जागा होती. कोर्टाच्या आदेशानुसार ती जागा मिळाली. मिर्ची हे भारताचे नागरिक आहेत. ते नियमित टॅक्स भरतात. मी 2007 मध्ये सगळी पार्श्वभूमी तपासली होती, त्यांच्याबरोबर व्यवहार करण्यात काही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री केल्यानंतर मी कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. त्यामुळे आमच्या संबंधावर वाद उपस्थित करणे गैर आहे", असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले.

काय आहे प्रकरण?

'सीजे हाऊस' या 15 मजली बिल्डिंगचे कंस्ट्रक्शन अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्ची आणि मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने 2006-07 मध्ये केले होते. करारानुसार सीजे हाऊसमध्ये दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आली होती. 2007 मध्ये मेसर्स मिलेनियम डेव्हलपर्सने या बिल्डिंगचा तिसरा आणि चौथा मजला इक्बाल मिर्चीच्या नावे ट्रान्सफर केला होता. त्याचे क्षेत्रफळ जवळपास 14000 स्क्वेअर फूट होते. या दोन मजल्यांची किमत 200 कोटींच्या जवळपास आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांची पत्नी मिलेनियम कंपनीत शेअरहोल्डर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...