आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज शिक्षणाची अवस्था घर का ना घाट का झाली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शिक्षण नादारी अर्ज करून पाच ते दहा हजारांत पूर्ण होत असे. गेल्या चार-पाच वर्षांत शैक्षणिक शुल्कात झालेली वाढ पाहता गरिबांना शिक्षण घेणे दुरापास्तच झाले आहे सत्तापालट झाल्यानंतरही कोणी शैक्षणिक शुल्क कमी करण्याचे आश्वासन देईल, असे वाटत नाही.

मोदी सरकार कौशल्यावर आधारित शिक्षणास चालना देण्याच्या योजना राबवत आहे. पण तंत्रज्ञान शिकण्यासाठी विद्यार्थ्यास एका वर्षास एक लाख रुपये इतकी फी द्यावी लागत असेल तर त्याला कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. या संस्था पुढाऱ्यांच्याच असून सरकारला बुडवण्याचा त्यांचा उद्योग जोरात आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी संघटित होण्याची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...