आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी.एड शेतकऱ्याने अगोदर पत्नीचा खूण केला, मुलांवर रजई टाकली..... आणि रजई बंद केल्यानंतर मुलाने तेथेच केले मुत्रविसर्जन, मुलीचा झाला मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फिरोजपुर (पंजाब) : जिल्ह्यातील गावात एक हृदय पिटाळून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका शेतकऱ्याने संशयास्पदरित्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून फरार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत तीन मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले आहेत. पोलिसांनी याप्रकरणाबाबत कारवाई करत 3 लोकांविरूद्ध गुन्हा नोंदवुन तपासणी सुरू केली आहे.  


मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेची सासुसहित दोन भावांविरुद्धा गुन्हा दाखल करून तपासणी सुरू केली आहे. आरोपी शेतकरी डी.एड पास झाला असून शाळेतील मुलांना शिकवत होता. या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पारिवारिक वादामुळे ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी तपासणीत दिसून आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. 

पोलिस अधिकारी मोहित धवन यांनी सांगितले की, आरोपी परमजीत सिंगने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर रात्रभर त्यांच्या मृतदेहाजवळ थांबला होता. सकाळ होताच त्याने तेथून पळ काढला. महिलेचा विवाह 14 वर्षांपूर्वी आंसल या गावातील रहिवासी परमजीत सिंगसोबत झाला होता. तिच्या सासरचे मंडळी तिचा छळ करत होते. परमजीत सिंगने आपल्या परिवारासोबत मिळून महिलेची हत्या केल्याचा संशय असल्याचे महिलेचा भाऊ गुरविंदर सिंगने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 


सकाळी उठल्यावर पाहिले असता दरवाजा बंद होता : महिलेचा भाऊ
परमजीत सिंगचा भाऊ अवतार सिंगने सांगितले की, सकाळी उठल्यानंतर परमजीत सिंगच्या खोलीचा दरवाजा बंद होता. बऱ्याचवेळापासून मुलं बाहेर आले नव्हते. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता पलविंदर कौर पलंगावर पडलेली होती आणि दोन्ही मुलेही तिथेच होते. रजई उचलल्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. मात्र आरोपी यापूर्वीच फरार झाला होता. 

 

पत्नीच्या गळ्यावर होत्या जखमा
पलविंदर कौर यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केले होते. तर श्वास गुदमरल्यामुळे मुलांचा मृत्यू झाल्याचे दिसत होते. पोलिसांनी मुलांचे शवविच्छेदन केले असता प्रभनूर सिंग (6) चे मुत्र त्यात आढळून आले. तर गुरकिरत कौरच्या शरीरावर कोणत्याही जखमेची खूण नव्हती. महिलेच्या भावाचे लग्न असल्यामुळे तिला माहेरी जायचे होते. पण त्याआधीच तिचा खूण करण्यात आला. परमजीत सिंग फरार झाल्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केला. जेणेकरून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला जाणार नाही. पण सायबर सेलच्या मदत घेण्यात येत आहे. 

 

एक वर्षांपूर्वी करत होता नशा
परमजीत सिंग एक सुशिक्षीत शेतकरी होता. त्याने बी.एडचे शिक्षण घेतले होते. काही वर्षांपूर्वी तो व्यसनाच्या अधिन गेला होता. त्यावेळी त्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याने व्यसन करण्याचे सोडून दिले. एक वर्षापासून तो दररोज सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत गुरुद्वारामध्ये जात होता. अनेक वेळा त्याची पत्नी देखील गुरुद्वारामध्ये येऊन सेवा करत होती. एका सुशिक्षीत शेतकऱ्याने असे पाऊन उचलणे खरंच हैराण करणारे आहे. 

बातम्या आणखी आहेत...