Home | Business | Business Special | eesl will sale 30 percent cheaper ac from this july

स्वस्त AC विकणार सरकार, ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 24 तासात होम डिलीव्हरी

दिव्य मराठी | Update - May 15, 2019, 03:17 PM IST

एसीची किंमत बजेटमध्ये असून यासाठी अत्यंत कमी वीज लागेल

 • eesl will sale 30 percent cheaper ac from this july

  उन्हाळ्यात थंड हवेसाठी आपण ACला प्राधान्य देतो. पण महाग असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तो परवडत नाही. म्हणून आता शासनामार्फत लवकरच बाजारात स्वस्त AC उपलब्ध होणार आहेत. मार्केट रेटच्या 15 टक्के स्वस्त आणि ब्रँडेड ए.सी. खरेदी करण्याची संधी सरकार ग्राहकांना देणार आहे. EESL या शासकीय कंपनीद्वारे हा ए.सी. लॉन्च केला जाईल. तसेच या एसीची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये असून यासाठी अत्यंत कमी वीज लागेल.


  ऑनलाईन खरेदी करण्याची संधी
  हा AC आपण ऑनलाईनही खरेदी करू शकता किंवा एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता. म्हणजे आपला जुना ए.सी. देऊन नवीन ए.सी आपल्याया घेता येईल. यामुळे ए.सीमुळे आपल्या वीजबिलात 35 ते 40 टक्के बचत होणार आहे.


  शासनाद्वारे ही सुविधा येणाऱ्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 24 तासाच्या आत घरात ए.सी. लावण्याची गॅरंटी कंपनीने दिली आहे. यासाठी EESL कंपनी जुलै महिन्यापासून सामान्य नागरिकांसाठी मार्केट प्लेस लॉन्च करणार आहे.


  कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना जुलैपर्यंत स्वस्त ए.सी. मिळतील. तसेच, पुढील वर्षापर्यंत 2 लाख ए.सी. विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. पण हा ए.सी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.


  कंपनीने यापुर्वीही कमी किंमतीत अनेक उपकरण उपलब्ध केले आहेत. यामध्ये घरातील स्वस्त LED आणि ट्युबलाईटचा समावेश आहे. त्यामुळे आता कंपनीने घरा-घरात स्वस्त ए.सी. देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने स्वस्त ट्यूबलाईट आणि पंखे विक्री करण्याचे काम Discom या कंपनीसोबत मिळून केले होते.

Trending