आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशांतर्गत स्पर्धेचा झाला खेळखंडाेबा; अनेक सामनेही रद्दची घाेषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काेराेना व्हायरसचा वाढता धाेका लक्षात घेता माेठा निर्णय घेतला. यातूनच बीसीसीआयने शनिवारी इराणी चषकासह देशांतर्गत अनेक स्पर्धा रद्द करण्याची घाेषणा केली. यामध्ये १८ मार्चपासून सुरू हाेणारा रणजी चॅम्पियन साैराष्ट्र आणि शेष भारत यांच्यातील सामन्यांसह अनेक माेठ्या स्पर्धांचा समावेश आहे.

क्रिकेट


> ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यातील उर्वरित २ वनडे व तीन टी-२० सामने रद्द.  

> महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने ३१ मार्चपर्यंतचे सर्वच स्पर्धेचे सामने रद्दची घाेषणा केली आहे.   

> आयसीसीने क्रिकेट वर्ल्डकप लीग-२ सिरीज लांबणीवर टाकली आहे. १ ते ८ एप्रिलपर्यंत लांबणीवर आहे.   

फुटबॉल


> फीफाने मार्च  व एप्रिलदरम्यानच्या सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. 

> इंग्लिश क्लब न्यूकॅसलच्या मॅनेजरने खेळाडूंना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.   

> ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनने आय लीगचे सर्व सामने ३१ मार्चपर्यंत रद्द केले आहेत.   


> आफ्रिका आणि सायप्रास यांच्यातील, तसेच जर्मनी-इटली यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना रद्द करण्यात आला.  


> स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाने सर्व प्रकारच्या सरावांना रद्द केले.   अॅथलेटिक्स


> 20 एप्रिलला हाेणारी बाेस्टन मॅरेथाॅन पुढे ढकलण्यात आली. आता ही रेस १४ सप्टेंबरला आयाेजित केली जाईल. तसेच २६ एप्रिलची लंडन मॅरेथाॅन आता ४ आॅक्टाेबरला हाेणार आहे.   कार रेसिंग

> नेसकारने रविवारी हाेणारी अटलांटा मोटर स्पीडवेवरील आणि पुढच्या आठवड्यातील मियामी स्पीडवेवरची रेस रद्द झाल्याची घाेषणा केली आहे.  बॅडमिंटन

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने १६ मार्च- १२ एप्रिल दरम्यानच्या सर्वच प्रकारच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. यात दिल्ली येथील इंडिया आेपन स्पर्धांचा समावेश आहे. याला २४ मार्चपासून दिल्ली येथे सुरुवात हाेणार हाेती.  

टेनिस

आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने यादरम्यानच्या आपल्या सर्वच आंतरराष्ट्रीय स्पर्धा २० एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकल्या. तसेच काही देशातील स्पर्धा रद्द केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...