आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपाशीवर फक्त १० टक्क्यांच्या आत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सद्य:स्थितीत कपाशीचे पीक पात्या, फुले व बोंड अवस्थेत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा ५ ते १० टक्केपर्यंत प्रादुर्भाव फुलामध्ये ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात दिसून आला. शेतकऱ्यांनी नियोजन करून बोंडअळीचा हल्ला परतवून लावला आहे. सद्य:स्थितीत हा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उपाय करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 


फेरोमोन सापळे, डोमकळ्या वेचून नष्ट करणे, निंबोळी अर्काची फवारणी व लक्षणीय प्रादुर्भावाच्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार वेळीच वापर करून या किडीच्या प्रादुर्भावावर आवर घालण्यात यावा. तालुकापातळीवर गुलाबी बोंडअळी तसेच भातावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाच्या स्थितीवर नियमित निरीक्षण ठेवून या किडीमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्यास शेतकऱ्यांना अवगत करून नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याबाबत जनजागरण करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव ५ टक्केपेक्षा कमी असून, सध्या कीड अळी व कोषावस्थेत आहे. त्यामुळे पतंगाचे प्रमाण कमी झाले अाहे. कामगंध सापळ्यांमध्ये पतंग कमी येत आहेत. गुलाबी बोंडअळीचे पतंग निशाचर असल्यामुळे अंधाऱ्या रात्री त्याचे मिलन होऊन अंडी देतात. विशेषत: या प्रक्रियेत अमावस्ये दरम्यान वाढ होते. अमावास्येनंतर जसा जसा चंद्र कलेने वाढत जातो, तसा अंड्यातून अळ्या निघण्याचे प्रमाण वाढते. सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पतंगाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


एकाच वेळी सामूहिक पद्धतीने औषधांची करा फवारणी 
फवारणी शांत वारा असताना हवेच्या दिशेने तेही सकाळी ११ वाजेपर्यंत किंवा सायंकाळी ४ वाजेनंतर करावी. फवारणी करताना संरक्षक कपड्यांचा वापर करावा. ज्या गावात, भागात किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. तेथील संपूर्ण कापूस क्षेत्रावर शेतकऱ्यांनी एकाच वेळी सामूहिक पद्धतीने औषधांची फवारणी करावी. जेणेकरुन किडीचा इतर भागात प्रसार रोखण्यास मदत होईल, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...