Jyotish / तुमच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वावर कसा पडतो नऊ ग्रहांचा प्रभाव

जाणून घ्या, 9 ग्रहांचा आपल्या आयुष्यवर कसा पडतो प्रभाव?

दिव्य मराठी वेब

Jun 19,2019 12:05:00 AM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 9 ग्रहांच्या स्थितिवरच आपले जीवन अवलंबुन आहे. जन्माच्या वेळी बनवण्यात आलेली कुंडली 12 भांगामध्ये विभाजित असते. या 12 भागांमध्ये 9 ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थिती राहतात. सर्व ग्रहांचे शुभ-अशुभ फळ असतात. आपल्या कुंडलीत जो ग्रह चांगल्या स्थितीत असतो तो आपल्याला चांगले फळ देतो. आणि जो ग्रह कुंडलीत अशुभ स्थितीत असतो तो वाईट फळ देतो. सर्व 9 ग्रहांचे फळ वेगवेगळ्या क्षेत्रात प्राप्त होते. जाणुन घ्या कोणता ग्रह कोणत्या गोष्टीसाठी कारक असतो.

सूर्य
सूर्य आपल्याला यश आणि मान-सन्मान प्रदान करतो. सूर्य शुभ असल्यावर आपल्याला समाजात प्रसिद्धी मिळते. सूर्याच्या अशुभ असल्यास विपरीत फळ प्राप्त होतात. वारंवार अपमान होतो.


चंद्र
चंद्राचा संबंध आपल्या मनाशी असतो. चंद्र चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ति शांत होतो. परंतु चंद्र अशुभ स्थितीमध्ये असल्यास मानसिक तणाव वाढतो.


मंगळ
मंगळ आपल्या धैर्य आणि पराक्रमाला नियंत्रित करतो. जर मंगळ शुभ असेल तर व्यक्ति कुशल प्रबंधक असतो. सोबतच शुभ मंगळ भूमी संबंधित कार्यांमध्ये लाभ देते. अशुभ असल्यास रक्ताशी संबंधित दोष निर्माण होतात.


बुध
बुध ग्रह आपल्या बुध्दी आणि वाणीला प्रभावित करतो. जर बुध शुभ असेल तर आपली बुद्धी पवित्र राहते. हा ग्रह अशुभ असल्यास नोकरी आणि बिझनेसमध्ये नुकसान होते.


गुरु
गुरु ग्रह आपल्या धार्मिक भावनांना नियंत्रित करतो. याला भाग्य आणि विवाह संबंधीत गोष्टींचे कारक ग्रह मानले जाते. गुरु शुभ असल्यावर वैवाहिक जीवन श्रेष्ठ राहते. गुरु अशुभ असल्यास लग्न जमण्यास उशीर होतो आणि पती-पत्नीमध्ये वाद होत राहतात.


शुक्र
शुभ शुक्राने प्रभावित व्यक्ति कलाप्रेमी, सुंदर आणि ऐश्वर्य प्राप्त करणारा असतो. हा ग्रह अशुभ असल्यास पैशांशी संबंधित समस्या आयुष्यभर राहतात.


शनि
ज्या व्यक्तिची कुंडलीमध्ये शनी शुभ असतो. तो सुख प्राप्त करणारा आणि शक्तिशाली असतो. शनि अशुभ असल्यावर अनेक समस्या सहन कराव्या लागतात.


राहु
ज्या व्यक्तिची कुंडली राहु बलशाली असते. तो कठोर स्वभावाचा, प्रखर बुध्दी असणारा असतो. अशुभ असल्यास शत्रू जास्त होतात आणि वाईट सवयींच्या आहारी जातो.


केतु
केतु शुभ असेल तर व्यक्ति कठोर स्वभाव असणारा, गरीबांचे हित करणारा असतो. अशुभ असल्यास व्यक्ती वाईट सवयीच्या विळख्यात अडकतो.


येथे सांगण्यात आलेले सर्व फळ अन्य ग्रहांच्या स्थिति आणि दृष्टीच्या आधारावर बदलु शकता. कुंडलीच्या वेगवेगळ्या स्थानांमध्ये ग्रहांचा प्रभाव बदलु शकतो.

X
COMMENT