पार्टनरची चीटिंग करायची / पार्टनरची चीटिंग करायची असेल EXPOSR, तर मग वापरा या खास 8 ट्रिक

Nov 06,2018 01:34:00 PM IST

चीटिंग/फसवणुक हे नातेसंबंधांमधील कटू सत्य आहे. प्रत्येकालाच विविध परिस्थितीत फसवणुकीचा सामना करावा लागतो. कुठल्यातरी मार्गाने लोक आपली फसवणुक करत असतात. पण ही फसवणुक जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत करत असेल तर मग तुम्ही काय कराल? तो किंवा ती तुमची फसवणुक कशा पद्धतीने करत आहे, याचा शोध आता तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तुमचा पार्टनर तुमची फसवणुक करत असल्याचा संशय तुम्हाला असल्यास त्याला कसे रंगेहाथ पकडता येतील, याविषयीच्या काही खास ट्रिक्स तुम्हाला येथे वाचता येतील.

तुमच्या भेटीचे शेड्युल अचानक बदलले जाते...
जर तुमचा पार्टनर भेटीचे वेळापत्रक अचानक बदलत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी, तर मग काही तरी गडबड असल्याचे समजा. शेड्युल घाईच्या कामाशी निगडीत असायला नको. तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरची चीटिंग पकडण्यासाठी ठरलेल्या शेड्युलऐवजी वेगळ्या वेळेला भेटा. जर तो खरंच कामात असेल तर सत्य समोर येईलच नाही तर मग त्याचं 'सत्य' पकडलं जाईल.

पुढील स्लाईड्सवर वाचा, आणखी 8 अशा गोष्टी ज्याच्या मदतीने तुम्ही पार्टनरची चीटिंग नक्कीच एक्सपोज करु शकाल..

झोपण्याची सवय बदला... तुमच्या नेहमीच्या झोपण्याच्या पद्धतीत बदल करुनदेखील तुम्ही तुमच्या पार्टनरची चीटिंग पकडू शकता. जर तुमचा पार्टनर तुम्ही झोपल्यानंतर एखाद्याशी फोनवर बोलत असल्याचा किंवा तुम्ही उठण्यापूर्वी बेडवरुन उठून दुस-या ठिकाणी जाऊन इतर कुणाशी बोलत असल्याचा तुम्हाला संशय असल्यास तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळेत बदल करा.चुकीच्या वेळी शो ऑफ करा... जर तुमची एखादी सवय बदलण्यासाठी तुमचा पार्टनर तुमच्याकडे हट्ट करत असेल, तर चुकीच्या वेळी तुम्ही तुमची तीच सवय पार्टनरसमोर शो ऑफ करा. जर त्यावेळी तुमच्या पार्टनरने तुम्हाला न टोकता तुमचे कौतुक केले तर मग मात्र काही तरी गडबड असल्याचे समजून जा.फेक फेसबुक प्रोफाइल बनवून करा चॅट... आपल्या पार्टनरची चीटिंग पकडण्यासाठी फेक फेसबुक प्रोफाइल बनवून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा. त्याने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर हळूहळू त्याच्यासोबत बोलणे सुरु करा आणि त्याला भेटण्यासाठी बोलवा. जर तो भेटण्यासाठी तयार झाला तर तो तुमची फसवणुक करत असल्याचे तुमच्यासमोर उघड होईळ.किचन आणि बेडरूमचे निरिक्षण करा.. बेडरूम आणि किचनचे निरिक्षण करुनसुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या चीटिंगचा शोध घेऊ शकता. किचनमध्ये कदाचित ड्रिंकचे कॅन तुम्हाला आढळू शकते. शिवाय मोबाइलवरुन डायल करण्यात आलेल्या नंबरवरुनसुद्धा तुम्ही याचा शोध घेऊ शकता.भांडणानंतर फॉलो करा पार्टनरचे वागणे जर तुमचे तुमच्या पार्टनरसोबत एखाद्या गोष्टीवरुन भांडण झाले असेल, तर त्याचे वागणे वॉट करा. फसवणुकीचा प्रकार भांडणानंतरच सुरु होत असतो. त्याच्या वागण्यावरुन तुम्ही त्याचे चीटिंग पकडू शकता.पार्टनरकडे खासगी गोष्टीसाठी वेळ मागणे तुमचा पार्टनर बिझी असल्याचे बघून त्याला खासगी बोलण्यासाठी वेळ मागा. जर तो तुमच्यावर चिडला तर मग समजा का तो तुमची फसवणुक करतोय.तुमच्या पार्टनरला स्पेस देण्यासाठी होकार द्या जर तुमचा पार्टनर एकटे राहण्यासाठी तुमच्याकडे स्पेस मागत असेल आणि तुम्ही त्यासाठी संमती द्या. त्यानंतर तो एकटा घराबाहेर पडल्यानंतर त्याचा पाठलाग करा. अशावेळी तुमचा पार्टनर एकट्यात नेमका काय करतो, त्याच्या आयुष्यात दुसरं तिसरं तर कुणी नाही ना... याचा शोध तुम्हाला लागू शकतो.
X