आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नी निरोगी असूनही मिळत नसेल अपत्य सुख तर कुंडलीत असू शकतो हा एक दोष, अशुभ योगाचे 10 संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये असे काही दोष सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यक्तीला वाईट काळाला सामोरे जावे लागू शकते. यामधीलच एक दोष आहे पितृ दोष. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यावर राहूची दृष्टी पडत असेल किंवा सूर्य आणि राहू एकत्र असल्यास पितृदोष तयार होतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार कुंडलीत राहू पाचव्या स्थानात असल्यास पितृ दोषाचा प्रभाव राहतो. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत राहतात आणि घरात अशांती राहते. येथे जाणून घ्या, पितृ दोषाचे खास संकेत, जे दैनंदिन आयुष्यात मिळतात...


> ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असेल त्यांना जमीन-जायदाद, घर खरेदी-विक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. लग्न जमण्यात आणि नोकरीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


> पुरुषाच्या कुंडलीत पितृ दोष असल्यास अपत्य सुख मिळण्यात अडचणी निर्माण होतात. पती-पत्नी निरोगी असले तरीही अपत्य प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत राहतात.


> घराच्या उत्तर-पूर्व किंवा पश्चिम-दक्षिण दिशेला शौचालय असल्यास पितृ दोष वाढतो.


> पितृ दोषामुळे घरात धन असूनही कुटुंबात सुख-शांती राहत नाही. पती-पत्नीमध्ये वाद होत राहतात.


> वास्तुनुसार दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोपरा म्हणजे नैऋत्य कोणा पितृ स्थान मानले गेले आहे. कुंडलीमध्ये पितृ दोष असल्यास या दिशेला नकारात्मकता राहते.


> घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव ईशान्य दिशेकडून आणि नकारत्मक ऊर्जेचा प्रभाव नैऋत्य दिशेकडून होतो. जेव्हा कुंडलीत पितृदोष म्हणजेच राहू मजबूत होते तेव्हा व्यक्ती ज्या घरामध्ये राहतो त्या घरातील नैऋत्य दिशेला वास्तुदोष असतो.


> नैऋत्य दिशेला टॉयलेट, अस्वच्छता, नाली असणे, दक्षिण-पश्चिम दिशेला कचरा असल्यास राहूची नकारात्मक शक्ती वाढते. हासुद्धा पितृ दोषाचा संकेत आहे.


> दक्षिण-पश्चिम दिशेला पृथ्वीची ऊर्जा असते. घराच्या या दिशेला झाडे किंवा भिंतीचा रंग हिरवा असल्यास पृथ्वीची ऊर्जा समाप्त होते. यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. हासुद्धा पितृ दोषाचा एक संकेत आहे.


> घरामध्ये नैऋत्य कोपरा नात्याचे स्थान असून या दिशेला वास्तुदोष असल्यास वैवाहिक जीवनात विविध अडचणी निर्माण होतात.


> पितृ दोषामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होतात आणि अशांती कायम राहते.


# पितृ दोषासाठी ज्योतिषाची मान्यता 
ज्योतिष मान्यतेनुसार कुटुंबातील एखाद्या सदस्याचा अकाली मृत्यू झाला असेल आणि मृत व्यक्तीचे योग्य विधीनुसार श्राद्ध केले नसेल तर त्या कुटुंबात जन्म घेणाऱ्या अपत्याच्या कुंडलीत पितृ दोष राहतो. विशेषतः मुलाच्या अपत्य कुंडलीमध्ये पितृ दोष राहतो.


# करू शकता हे उपाय 
> पितृ दोष दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्यातील अमावस्या तिथीला तर्पण आणि श्राद्ध करावे. 


> पितरांसाठी धूप-दीप लावावा. ऊँ पितृदेवताभ्यो नम: मंत्राचा जप करावा.


> प्रत्येक वर्षी श्राद्ध पक्षात पितरांसाठी दान-पुण्य आणि तर्पण इ. शुभ कार्य करावेत.


> सूर्यदेवाला दररोज सकाळी अर्घ्य द्यावे.

बातम्या आणखी आहेत...