आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Efforts Of 76 People In The World To Fail; 4 Succeeded; Manisha Is The Only Woman In It

औरंगाबादच्या मनीषाने २२ हजार फूट उंच अॅकाँकागुअा शिखरावर फडकवला तिरंगा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अॅकाँकागुअा शिखरावर प्रजासत्ताकदिनी तिरंगा झेंडा उंचावला
  • २१ दिवसांचा खडतर प्रवास; २२ हजार ८३७ फूट उंचीचे टार्गेट पूर्ण
  • जगातील ७६ जणांचा प्रयत्न अपयशी; चाैघे यशस्वी; यात मनीषा एकमेव महिला

एकनाथ पाठक
 
औरंगाबाद- येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा वाघमारेने रविवारी अर्जेंटिनातील अॅकाँकागुअा या शिखरावर तिरंगा फडकवला. तिने २२ हजार ८३७ फुटांचा खडतर प्रवास यशस्वीपणे गाठला. हा पराक्रम करणारी ती राज्यातील पहिलीच गिर्याराेहक ठरू शकते. ‘मिशन गाे फाॅर सेव्हन समिट’च्या माध्यमातून तिने हे पाचवे शिखर सर केले.
 
एका बाजूला बर्फाच्छादित पॅसिफिक, बाजूच्या कडेला अाग अाेकणारे ज्वालामुखीचे शिखर, काेणत्याही अाधाराशिवाय चढावे लागते, ते २२ हजार फुटांचे अॅकाँकागुअा शिखर. याचा खडतर प्रवासही यशस्वीपणे वाट शाेधून अाैरंगाबादच्या शिखरकन्या मनीषा वाघमारेेने या शिखरावर तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला. यासाठी जगभरातील ८० गिर्याराेहकांनी शर्थीने प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपयशाला सामाेरे जावे लागले. यातील फक्त चार जणांनी यंदाच्या सीझनमध्ये हे शिखर सर केले. यामध्ये अाैरंगाबादची शिवछत्रपती पुरस्कार विजेती मनीषा ही एकमेव महिला गिर्याराेहक हाेती. माेठ्या धाडसाने तिने ही माेहीम फत्ते केली. यासह तिने  गाे फाॅर सेव्हन समिटमधील पाचव्या शिखराला पादाक्रांत करण्यात यश मिळवले अाहे. ही माेहीम फत्ते करणारी ती एकमेव अाहे.

यंदाच्या सीझनमध्ये चाैघांनाच संधी : हे शिखर सर करण्यासाठी वर्षभरातून एकच संधी मिळते. याच सीझनमध्ये हे गाठावे लागते. जगभरातील गिर्याराेहकांची नजर याकडे लागलेली असते. यंदा या शिखराकडे रवाना झाले हाेते. यासाठी  ८० जणांना संधी मिळाली हाेती. मात्र, फिटनेस अाणि काही तांत्रिक अडचणींमुळे ७६ जणांना माघार घ्यावी लागली. यातील फक्त चाैघांनाच पुढे जाता अाले.

राेप नाही; स्वत:तच मेहनत

दक्षिण अमेेरिकेतील अर्जेंटिनानजीक अॅकाँकागुअा नावाचे शिखर अाहे. तब्बल २२ हजार ८३७ फूट अशी याची उंची अाहे.  हे सर करण्यासाठी गिर्याराेहकाला माेठी मेहनत घ्यावी लागते. कारण, यासाठी कुठल्याही प्रकारचा राेप लावण्यात अालेला नाही. त्यामुळे हे सर करण्यासाठी स्वत:ला  कसरत करावी लागत असल्याचे दिसते.  कडाचा अासरा घेत चढावे लागते. 

अवयव निकामी; धाेका टळला:


दक्षिण  या माेहिमेच्या दरम्यान मनीषाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. यादरम्यान तिला अवयव निकामीच्या धाेक्याला सामाेरे जावे लागले. तिच्या हाताला ही दुखापत झाली हाेती. मात्र, त्यावरच्या उपाय अाणि उपचारामुळेच हा माेठा धाेका अाता दूर झाला अाहे. अाता ती सुखरूप अाहे. मात्र, यामुळे तिला अनेक यातना सहन कराव्या लागल्या. 

सहकाऱ्याने गमावला  जी

अर्जेंटिनामधील अॅकाँकागुअा नावाचे शिखर सर करण्यासाठी जगभरातील ८० गिर्याराेहकांनी प्रयत्न केला. या माेहिमेकडे अागेकूच करताना यातून अनेक जणांना माघार घ्यावी लागत हाेती. यातूनच  २० जणांनी काहीसा खडतर प्रवास पूर्ण केला.या माेहिमेेतील सहकाऱ्याला अपघातामुळे जीव गमवावा लागला.

स्टाॅप ग्लाेबल वाॅर्मिंगचा दिला संदेश; पाचवे  शिखर झाले स


जगातील सात खंडांतील सात सर्वोच्च शिखर पादाक्रांत करण्याचा शिखरकन्या मनीषा यांचा मानस आहे.यासाठीच त्यांनी ‘गाे फाॅर सेव्हन समिट’ ही माेहीम हाती घेतली अाहे. यासाठी ती माेठी मेहनत घेत अाहे. यातील चार तिने अातापर्यंत  यशस्वीपणे पार केले अाहे. याच माेहिमेतील पाचव्या  शिखरावरही तिने रविवारी प्रजासत्ताकदिनी तिरंगा फडकवण्याचा पराक्रम गाजवला अाहे. वाढत्या जागतिक तापमानाला बघता या मोहिमेदरम्यान मनीषाने “स्टाॅप ग्लोबल वॉर्मिंग” चा संदेश हाती घेतला आहे. 

१. आशिया खंड - एव्हरेस्ट शिखर - उंची २९०३५  फूट - कालावधी : २१.०५.२०१८
२. आफ्रिका खंड - किलीमांजारो शिखर - उंची १९३४० फूट ,कालावधी :  ०८.११.२०१५
३. युरोप खंड - एल्ब्रस शिखर - उंची १८५१० फूट - कालावधी :३१.०७.२०१५
४. ऑस्ट्रेलिया खंड - कोसिओस्को आणि ऑसी १० शिखर - उंची ७३१० फूट - कालावधी : ०३.११.२०१४

बातम्या आणखी आहेत...