Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Efforts should be made to recognize Lingayat religion: Umadevi Kalaburgi

लिंगायत धर्म मान्यतेसाठी सक्षम प्रयत्न हवेत : उमादेवी कलबुर्गी

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 10:49 AM IST

लिंगायत हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठ्या संख्येने आहेत.

 • Efforts should be made to recognize Lingayat religion: Umadevi Kalaburgi

  सोलापूर- लिंगायत हे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठ्या संख्येने आहेत. लिंगायतांचे एेक्य होणे गरजेचे असल्याचे विचार श्री. कलबुर्गी मांडत असत. त्यांचे विचार काळाच्या पुढे होते. लिंगायत धर्म मान्य झाला पाहिजे. त्यासाठी अधिक सक्षम प्रयत्न करत विचारांचे हे कार्य पुढे जाणे आवश्यक आहे, असे उमादेवी कलबुर्गी यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.


  अॅम्फी थिएटर येथे सत्यशोधक डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या स्मृतीनिमित्त प्रगती प्रकाशनतर्फे चन्नवीर भद्रेश्वरमठ लिखित लिंगायत स्वतंत्र धर्मच या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी कलबुर्गी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्रकाशक दत्ता थोरे, लेखक भद्रेश्वरमठ यांची उपस्थिती होती. श्री. थोरे यांनी प्रास्ताविक तर दीपक हाेमकर यांनी सूत्रसंचालन केले.


  यावेळी प्रा. डाॅ. सूर्यकांत घुगरे म्हणाले, वीरशैव आणि लिंगायत हे शब्द पर्यायवाची नाहीत. भिन्न संस्कृतीचा निर्देश करणारे ते शब्द आहेत. दोन वेगवेगळ्या विचारधारा आहेत. विचारधारा बदलली की परंपरा बदलते. लिंगायतांना वेद नव्हे तर वचने प्रमाण आहेत, अशी मांडणी डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी केली होती.


  विस्तृत माहिती
  डॉ. घुगरे म्हणाले, कलबुर्गी यांच्या विचारांची पालखी घेऊन लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी लिंगायत स्वतंत्र धर्मच या पुस्तकाची मांडणी केली आहे. ज्यातून लिंगायत धर्माबद्दलची विस्तृत माहिती मिळते. जे सत्य आहे, जे वस्तुस्थितीला धरून आहे, ते सांगितले गेले पाहिजे. संशोधनातून ही स्पष्टता येते. लिंगायत धर्म, महात्मा बसवेश्वर व वचन साहित्य यावर कलबुर्गी यांनी केलेली मांडणी अभ्यासण्यासारखी आहे. लिंगायत हा सनातन धर्म नाही, हे समजले पाहिजे.

Trending