आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील पुरग्रस्तांना सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न, आचारसंहितेमुळे यासाठी निवडणूक आयोगाकडे मागितली परवानगी - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आचारसंहितेमुळे यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असून आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. 
 
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुण्यातील विविध भागांना भेट देऊन आढावा घेतला. तसेच या घटनेत जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
 

सांगली-कोल्हापूरमधील नुकसानीच्या धर्तीवर पुण्यातील अतिवृष्टी बाधितांना मिळणार मदत 
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,  पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पीडितांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.  सांगली कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना दिलेल्या धर्तीवर पुण्यातील बाधितांना मदत दिली जाईल. मात्र, राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेमुळे यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे, त्याला आयोगाकडून लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यानंतर बाधितांना शासनाकडून तातडीने मदत दिली जाईल.