Home | Divya Marathi Special | egg-price-1200-in-hamirpur

अबब! एक अंडे १२00 रुपयांना

पंकज गुप्ता - हमीरपूर | Update - May 25, 2011, 12:17 PM IST

अमृतसरच्या मोगा गावात सध्या या अंड्याची चांगलीच चर्चा आहे. एक अंडे १२00 रुपयांना, तर मटन आहे ५ रुपये प्रतिकिलो.

  • egg-price-1200-in-hamirpur

    अमृतसरच्या मोगा गावात सध्या या अंड्याची चांगलीच चर्चा आहे. एक अंडे १२00 रुपयांना, तर मटन आहे ५ रुपये प्रतिकिलो. हे अंडे कोंबडीचे नाही, तर ते आहे इमू पक्ष्याचे. ऑस्ट्रेलियन जातीच्या या पक्ष्याची अंडी भरपूर पौष्टिक असतात. दक्षिण भारतात इमू पालन मोठ्या प्रमाणावर केले जाते मात्र उत्तर भारतात इमूची अंडी आणि मटन या गोष्टी अजून नव्या आहेत. त्यामुळे अमृतसरच्या एसपी हरजित सिंह यांनी पाळलेल्या या पक्ष्यांची मोठी चर्चा आहे. नत्थुवाला गरबी या गावात त्यांनी इमूच्या २५ जोड्या पाळल्या आहेत. इमूच्या अंड्यांचा आकार कोंबडीच्या अंड्यांपेक्षा १३ पटींनी मोठा असतो.

    एका अंड्याचे वजन ४ चे ७ ग्रामपर्यंत असते. अंड्यांचा रंग पांढरा किंवा लालसर नसून ही अंडी हिरव्या रंगाची असतात. विशेष म्हणचे हे अंडे पडले तरी फुटत नाहीत. इमूच्या अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकता असते. तसेच ते ९८ टक्के फॅट आणि कोलेस्टरॉल विरहित असते. त्यामुळे ही अंडी खाणा:यांना स्थूलपणाची चिंता नाही.

Trending