आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहंकारामुळे मनुष्य संत सहवासाला मुकताे

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

महावीर स्वामींच्या भेटीसाठी, त्यांच्याकडून ज्ञानार्जन करण्यासाठी गरीब-श्रीमंत, राजा-रंक सारेच जात असत. एके दिवशी एका राजाला स्वामींना भेटावेसे वाटले. ताे राजा असल्यामुळे किमती भेटवस्तू स्वामींना देण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा त्याचा प्रयत्न हाेता. त्याने सुंदर, महागडा हिऱ्यांचा हार साेबत घेतला आणि स्वामींच्या भेटीसाठी निघाला. महावीरजींना भेटल्यानंतर भेटवस्तू देण्यासाठी हिऱ्याचा हार त्यांच्यासमाेर धरला. महावीर म्हणाले, ते फेकून दे. राजाने त्यांचे म्हणणे एेकले, परंतु इतका महागडा हार महावीरांनी फेकून द्यायला सांगितला! ताे विचारात पडला, बहुधा त्यांना हार आवडलेला नसेल असा ताे विचार करू लागला. दुसऱ्या दिवशी पुन्हा महागडा गुलदस्ता घेऊन राजा महावीरांसमाेर पाेहाेचला आणि त्यांना भेट दिला. महावीर पुन्हा म्हणाले, कुठल्या तरी काेपऱ्यात दे ते फेकून..! राजाने गुलदस्तादेखील फेकून दिला. परंतु त्याला काही उमजत नव्हते. दिवसभर ताे त्रस्त राहिला. सायंकाळी त्याने मंत्र्यास बाेलावले आणि सारी हकिगत सांगून त्यास विचारले, यामागे नेमके कारण काय असू शकेल? मंत्री थाेडा समजदार हाेता. म्हणाला, 'महाराज, उद्या काेणतीही वस्तू साेबत न घेता रिकाम्या हातानेच जा.' राजा म्हणाला, 'मी एवढ्या विशाल साम्राज्याचा अधिपती आहे आणि रिकाम्या हाताने कसे जाऊ शकताे? जाेपर्यंत महावीरांना काही भेटवस्तू देणार नाही ताेपर्यंत माझ्या राजेशाही (अहंकार)ला आनंद कसा मिळेल..?' मंत्री म्हणाला, 'तुम्ही स्वत:च एक भेटवस्तू आहात. महाराज, तुम्ही रिक्तहस्ताने भेट घेऊन तरी पाहा.' दुसऱ्या दिवशी राजा रिक्त हातांनी महावीरांच्या भेटीस गेला. मनातल्या मनात विचार करू लागला. पाहताे, आज स्वामीजी काय टाकून द्यायला सांगतात ते! ताे राजा हाेता त्यामुळे काेणासमाेर झुकणे त्याच्या स्वभावात नव्हते. महावीरांसमाेर ताठ मानेने, छाती ताणून उभा राहिला. जसेही स्वामींचे लक्ष त्याच्यावर गेले, त्यांनी वरपासून खालपर्यंत पाहिले अन्् म्हणाले- आज स्वत:ला टाकून दे. महावीरांसारख्या सिद्ध-संत पुरुषांची ही वाणी हाेती. त्यामुळे राजाच्या काळजाचा तिने ठाव घेतला. एव्हाना त्याच्या लक्षात आले की फकीर (संतपुरुष) मनुष्यातील 'अहं' (अहंकार) कशा प्रकारे घालवतात. त्यानंतर राजा महावीरांच्या चरणी लीन झाला.

शिकवण : अहंकार हा माेठा अवगुण आहे. बेगडी अभिमानामुळे संत-महापुरुषांच्या सहवासाला ताे मुकताे. त्याची शक्यतादेखील नाहीशी हाेते. जेव्हा तुम्ही संत किंवा ईश्वरासमाेर झुकाल त्या वेळी अहंकार गळून पडेल आणि वास्तव समाेर येईल...

बातम्या आणखी आहेत...