आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तचे बडतर्फ राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांचा सुनावणीदरम्यान संशयास्पद मृत्यू, 2013 पासून होते अटकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅरो - इजिप्तचे बडतर्फ माजी राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी यांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. कोर्टात सुनावणी सुरू असतानाच ते अचानक कोसळले. अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शवविच्छेदनात त्यांच्या शरीरावर कुठल्याही स्वरुपाच्या मारहाणीचे किंवा कापल्याचे निशाण नाहीत. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता असे सांगितले जात आहे. 67 वर्षीय मोहंमद मोर्सी यांना हेरगिरीच्या आरोपांनंतर 2013 मध्ये पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. तेव्हापासूनच ते तुरुंगात होते. मोर्सींचे कुटुंबीय आणि अॅम्नेस्टीने या मृत्यूवर संशय व्यक्त केली. तसेच सखोल आणि निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे.


इजिप्तचे पहिलेच लोकनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष होते मोर्सी
> मुस्लिम ब्रदरहुडचे नेते आणि होस्नी मुबारकच्या हुकुमशाहीविरोधातील आंदोलनकर्ते मोहंमद मोर्सी इजिप्तचे पहिले लोकनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष होते. इजिप्तमध्ये पहिल्यांदाच (2012) मध्ये झालेल्या लोकशाही निवडणुकीत त्यांच्या पक्षाला बहुमत मिळाले होते. पदावर आल्यानंतर त्यांनी 6 महिन्यांतच नवीन राज्यघटना आणि राष्ट्राध्यक्षाला सर्वोच्च अधिकार मिळवून देणारा प्रस्ताव मांडला.
> मोसींच्या या प्रस्तावाच्या विरोधात देशभर अचानक मोर्सीविरोधी आंदोलन भडकले. या आंदोलनात 10 कार्यकर्त्यांचा पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. त्यावरून हिंसक आंदोलन पेटले. 1 जुलै 2013 रोजी इजिप्तचे लष्करप्रमुख अब्दल फताह अल सिसी यांनी मोर्सींना राजीनामा देण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला. मोर्सींनी तो फेटाळून लावला. यानंतर 3 जुलै 2013 रोजी लष्करप्रमुख सिसी यांनी मोर्सींची सत्ता उलथवली आणि सरकारची सूत्रे आपल्या हातात घेतली.
> 2013 पासूनच मोर्सी जेलमध्ये होते. त्यांच्यासह त्यांच्या सहकारी नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना देखील तुरुंगात डांबण्यात आले. या दरम्यान शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांना मृत्यूदंड आणि जन्मठेपेच्या शिक्षा सुनावण्यात आल्या. मोर्सींना देखील मृत्यूदंड सुनावण्यात आला होता. परंतु, 2016 मध्ये त्यावर फेरविचार केल्यानंतर त्यांच्या शिक्षेत बदल करून 20 वर्षांची कैद सुनावण्यात आली. 17 जून 2019 रोजी त्यांना कोर्टात हजर केले असता ते अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.