आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने माकडासोबत केले \'हे\' कृत्य, क्लिप झाली व्हायरल; आता कोर्टाने सुनावली 3 वर्षांची कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो - इजिप्तमध्ये एका 25 वर्षीय तरुणीला कोर्टाने 3 वर्षांची कैद सुनावली आहे. तिने बसमा अहमद असे या तरुणीचे नाव असून तिने माकडाच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला होता. यासंदर्भातील व्हिडिओ सुद्धा शेअर केला. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्यानंतरच तिच्याविरोधात माकडाचा लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मंसूरा जिल्हा न्यायालयाने याच प्रकरणी दोषी ठरवून तिला तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे. 


इजिप्तचे स्थानिक अल-अहरामच्या वृत्तानुसार, याच वर्षी ऑक्टोबरमध्ये बसमा आणि माकडाची क्लिप समोर आली. 90 सेकंदांच्या या क्लिपमध्ये ती माकडाच्या प्रायव्हेट पार्टला वारंवार हात लावून मोठ्याने हसत होती. केवळ तीच नव्हे, तर तिचा व्हिडिओ शूट करणाऱ्यांमध्ये सुद्धा हास्यकल्लोळ होता. कॉलेजचे विद्यार्थी आणि इतर ग्रुप्समध्ये ही क्लिप व्हायरल झाली. काहींनी हे प्रकरण हसण्यावर नेले. तर काहींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तरुणीवर टीका केली. यानंतर इजिप्तमध्येच तिच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तिला 15 दिवसांसाठी ताब्यात घेतले होते. आता कोर्टाने तिला दोषी ठरवून कैद सुनावली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...