आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Eicher Motors Shares Tumble Over 9% On Weak Dec Sales

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॉयल इनफील्डने दिला झटका, कंपनीला बसला 6 हजार कोटींचा फटका...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सगळ्यात दमदार मोटारसायकलमध्ये असलेली एक रॉयल इनफील्ड (Royal Enfield) च्या विक्रीत घट झाली त्यामुळे एयचर मोटार्सला मोठा झटका बसला आहे. हा झटका इतका मोठा होता की, काही वेळातच कंपनीची मार्केट व्हॅल्यू 6 कोटींनी कमी झाली. या बातमीमुळे बुधवारी एयचर मोटर्स (Eicher Motors) चा स्टॉक अंदाजे 9 टक्के कमी झाला, ज्याचा परिणाम थेट त्याच्या मार्केट व्हॅल्यूवर दिसला. महत्त्वाची बाब म्हणजे डिसेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत 13 घट झाली आहे आणि यांत रॉयल इनफील्ड (Royal Enfield) चे योगदान आहे.

  
Royal Enfield विक्रीत झाली 13 टक्के घट
खरतर, एयचर मोटर्सच्या टू-व्हीलर डिवीझनची विक्री डिसेंबरमध्ये 13 टक्क्यांनी घसरली आणि ती 58,278 यूनिटवर आली आहे, परंतु मागच्या वर्षी हा आकडा 66,968 यूनिट होता.

यानंतर ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओसवालने आपल्या एका रिसर्च रिपोर्ट मध्ये म्हटले, ‘कॉस्ट (इंश्यूरंस, रिअर डिस्क ब्रेक आणि एबीएसशी जुडलेल्या) मध्ये वाढ आणि जावा (Jawa) मोटारसायकल अल्यामुळे ग्राहकांकडे पर्याय उपलब्ध झाले आहेत आणि त्यामुळेच विक्रीत घट झाली आहे आणि ती अशीच होत राहिल.’ 

 

6 हजार कोटी रूपयाने घटली कंपनीची मार्केट व्हॅल्यू
विक्रीतील झालेली घटमुळे एयचर मोटर्सचा शेअर अंदाजे 9 टक्क्यांनी कमी झाला आणि तो 21164 रूपयावर आला. शेअरने 21000 रूपयांचा इंट्रा-डे लो टच केला. यामुळे कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी होऊन ती 57778 कोटी रूपये राहिली आहे.


ट्रक आणि बसची विक्री वाढली
एयचर मोटर्सचे ट्रक आणि बसबद्दल बोलायच झाले तर यांची विक्री 2.6 टक्क्यांनी वाढून 6,113 यूनिट झाली आहे, तर मागच्या वर्षी हा आकडा 5,955 यूनिट होता. एयचर ब्रँडच्या कमर्शिअल व्हीकल्सची विक्री 10 टक्क्यांनी वाढून 1,001 वर गेली आहे, तर मागच्या वर्षी हा आकडा 910 यूनिट होता.

 
तर वॉल्वो ग्रुप आणि एयचर मोटर्सचे ज्वाइंट वेंचर वीई कमर्शिअल व्हीकल्स लिमिटेड एकुण विक्रीत 2.4 टक्के वाढ होऊन 6,236 यूनिट झाली आहे, तर मागच्या वर्षी हा आकडा 6,087 यूनिट होता. पण वॉल्वोच्या ट्रकांची विक्री 132 यूनिट वरून घसरून 123 यूनिट झाली आहे.