आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आयशर टेम्पाे चालक व क्लिनरचा महिलेवर बलात्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपींनी अत्याचार केल्यानंतर निर्जनस्थळी सोडून काढला पळ
  • आळंदी ते पिंपरी-चिंचवड मार्गावरची घटना

पुणे - एका महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने आयशर टेम्पाे चालक व क्लिनरने महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करत तिला निर्जन स्थळी साेडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी २९ वर्षीय महिलेने अनाेळखी आयशर टेम्पाे चालक व क्लिनरविराेधात आळंदी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


 
पीडित महिला मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान आळंदी येथून पेरणे फाट्याला जाण्याकरिता गाडीची वाट पाहत थांबली हाेती. त्या वेळी अनाेळखी आयशर टेम्पाे चालकाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिला गाडीत बसवून पेरणे फाटा येथे साेडताे, असे सांगितले. परंतु, काही वेळात टेम्पाे चालकाने गाडी पेरणे फाट्याच्या रस्त्याने न घेता पिंपरी-चिंचवडच्या दिशेने नेत टेम्पाेच्या केबिनमध्ये चालक व क्लिनर आराेपी यांनी महिलेशी बळजबरी करत तिच्यावर सामूहिक अत्याचार  केला. त्यानंतर तिला घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठे करू नकाेस, अन्यथा मारून टाकू, अशी धमकीही आराेपींनी देत तिला शिवीगाळ करून मारहाण व दमदाटी करत पहाटे चार वाजता अज्ञात स्थळी साेडून दिले. पाेलिस आळंदी ते पिंपरी-चिंचवड परिसरा दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आराेपींचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास आळंदी पाेलिस करत आहेत.बातम्या आणखी आहेत...