आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ईद मुबारक...' बॉलिवूड सेलिब्रटीजने दिल्या शुभेच्छा, ट्विटरवर पाठवले सदिच्छांचे संदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आज पूर्ण देशात ईद-उल-फितर हा सण साजरा केला जात आहे. याप्रसंगी सेलिब्रेटीजने ट्विटरद्वारे ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, वरुण धवन, श्रद्धा कपूर, भूषण कुमार यांच्यासह अनेक सेलेब्सने ईदच्या शुभेच्छा. 

 

अमिताभ बच्चन... 
अमिताभ बच्चन यांनी लिहिले, ईद मुबारक...सर्वांमध्ये प्रेम, शांती आणि समृद्धि अबाधित राहो.  

 

 

दिलीप कुमार... 
दिलीप कुमार यांच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरूनही एक फोटो शेअर करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

 

 

भूषण कुमार... 
भूषण कुमारने ट्विटरवर ईदच्या शुभेच्छा देऊन लिहिले, 'ईदचा सण आपले आयुष्य आनंदाने भरू देवो, तुमचे मन प्रेमाने, तुमचा आत्मा समाधानाने आणि तुमचे मन ज्ञानाने भरून जावो. सर्वांना ईद मुबारक!'

 

 

वरुण धवन... 
लवकरच 'स्ट्रीट डांसर' च्या रूपात दिसणार असलेल्या वरुण धवनने ट्वीट करून लिहिले, 'तुम्हा सर्वांना ईद मुबारक, सहनती, प्रेम आणि प्रकाश.'

 

 

श्रद्धा कपूर... 
स्ट्रीट डान्सरमध्ये वरुणची को-स्टार श्रद्धाने लिहिले, 'सर्वांना ईद मुबारक, आपल्या सर्वांना प्रेम, एकता, आनंद वाटण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. खूप सारे प्रेम.' 

 

 

शंकर महादेवन... 
म्यूझिक कंपोजरने आपला खास दोस्त सलीम मर्चन्ट आणि सुलेमान मर्चन्टला टॅग करून लिहिले, 'डिअर सलीम आणि सुलेमान गाणे 'खुदा' बनवण्यासाठी तुम्हा दोघांचे खूप आभार. हे गाणे खूप शांततेने समाधानाने भरलेले आहे. सुंदर म्यूझिक आणि सुंदर आवाजासोबत बनवलेले हे गाणे शुद्ध हवेसारखे वाटते. ईद मुबारक.' 

 

 

सोफी चौधरी...  
सोफी चौधरीने ट्विटरवर ईदच्या शुभेच्छा देऊन लिहिले, 'जगभरातील माझ्या सर्व मित्रांना ईद मुबारक!! तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत या शुभ महिन्याचा शेवट साजरा करत शांती, सुख, समृद्धि आणि निश्चितपणे खूप सारा आनंद मिळावा !! खूप प्रेम.