आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील नालासोपाऱ्यात ATSचा छापा..घरातून आठ देशी बॉम्ब जप्त, आरोपी सनातनचा साधक असल्याचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी वैभव राऊत हा सनातनचा साधक असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे - Divya Marathi
आरोपी वैभव राऊत हा सनातनचा साधक असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे

मुंबई- नालासोपाऱ्यातील भंडारआळी येथील एका घरातून आठ देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुंबई एटीएसच्या पथकाने ही करवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी वैभव राऊत नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. वैभवच्या घरातून आठ देशी बॉम्ब जप्त करण्यात आले असून त्याच्या घरापासून जवळच असलेल्या एका दुकानातून मोठ्या प्रमाणात बॉम्ब बनवण्याचे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. 


आरोपी वैभव राऊत हा सनातनचा साधक असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे. सनातनचा साधक असल्याचे अनेक पुरावे देखील वैभवच्या घरातून मिळाले आहेत. मात्र, वैभव हा सनातनचा साधक नसून तो एक हिंदूत्ववादी कार्यकर्ता असल्याचा दावा सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांनी केला आहे. 

 

जप्त करण्यात आलेल्या साहित्यातून 2 डझनहून अधिक बॉम्ब बनवले जाऊ शकतात...

वैभव राऊतच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कशासाठी एकत्र करण्यात आली होती याचा तपास एटीएसकडून करण्यात येत आहे. जप्त करण्यात आलेल्या स्फोटक साहित्यातून 2 डझनहून अधिक बॉम्ब बनवले जाऊ शकतात असे सांगण्यात येत आहे. एटीएसला वैभवच्या घरी बॉम्ब असल्याची टीम मिळाली होती. त्यानुसार एटीएसच्या पथकाने गुरूवारी रात्रीपासून सापळा रचून त्याच्या घरी धाड टाकली. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब कशासाठी बनवले गेले, याचा तापास एटीएसकडून करण्यात येत आहे.

 

वैभव हा सनातनचा साधक नाही; सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांचा दावा...

सनातचे वकील संजीव पुनाळेकर यांनी वैभव सनातनचा साधक नाही, पण तो एक हिंदूत्ववादी कार्यकर्ता असल्याचा दावा केला आहे. त्याच्याकडे स्फोटकं सापडणं शक्य नाही, पोलिसांची भूमिका संशयास्पद असून सनातनला बदनाम करण्याचे हे गृहमंत्र्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वैभवला शक्य ती सर्व मदत करू असे देखील पुनाळेकर यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...