आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eight Class Student Commit Suicide When Refused To His Demand Of New Sim Card By Mother In Ludhiana Punjab

जाणुन बुजून आई-वडिलांनी केला नाही मुलाचा हट्ट पुर्ण, मुलाने घरी आल्यावर घेतला गळफास....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- सिम न दिल्यामुळे नाराज झालेल्या आडत व्यापाऱ्याचा 12 वर्षाचा मुलगा पारसने त्याच्या रूममध्ये गळफास घेउन आत्महत्या केली. त्याने शाळेचा ड्रेस घातलेला होता आणि पाठीवरची बॅग पण काढलेली नव्हती. आईने जेव्हा त्याला त्या लटकलेल्या अवस्थेत पाहिले, तीने ओरडत बाहेर जाऊन लोकांना बोलवले. लोकांनी घाई-घाईने मुलाला खाली उतरुन रूग्णालयात घेऊन गेले, पण डॅाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


एक हट्ट पुर्ण केला नाही म्हणुन दिला जीव

घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मुलाचे वडिल सुखविंदरने सांगितले की, ते भाजी मार्केटमध्ये आडतीचे काम करतात. पारस जीएमटी शाळेत 8वीत शिकत होता. बुधवारी दुपारी 3.30 वाजता तो शाळेतुन घरी आला. घरी आल्यावर आईकडे फोनचे सिम घेऊन देण्याचा हट्ट केला. पण आपला मुलगा अभ्यासाकडे लक्ष देणार नाही म्हणुन त्याच्या आईने सिम देण्यास नकार दिला. त्यामुळे नाराज होउन त्याने आत्महत्या केली.  आत्महत्या करण्यामागे हेच कारण हेते की, वेगळे कारण होते, पोलिस याचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...