आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराच्या अंगणात पाळीव कुत्र्याला सापडली विचित्र वस्तू; संशोधन केले तेव्हा समोर आले तेरा हजार वर्षांपूर्वीचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पाळीव कुत्र्याला एक विचित्र वस्तू सापडली आहे. या व्यक्तीचे नाव किर्क लेसवेल असून त्याचा पाळीव कुत्रा घराच्या मागील परिसरात खेळत होते. तेव्हा किर्कला कुत्र्याच्या तोंडात एक विचित्र वस्तु दिसली. सुरवातीला किर्कला ते हाड वाटले पण त्याने निरखून पाहिल्यानंतर ती वस्तू हाड नसून काहीतरी वेगळी वस्तू असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर किर्कने त्या विचित्र वस्तूची माहिती मिळवल्यानंतर ती वस्तू जवळपास 13000 वर्षांपूर्वीच्या 'वूली मेमोथ' नावाच्या प्राण्याचा दात असल्याचे समजले. 

 

कुत्र्याला सापडला 13000 हजार वर्षांपूर्वीच्या प्राण्याचा दात

> किर्कने सांगितल्यानूसार, त्याला कुत्र्याच्या तोंडात हाडासारखी वस्तू असल्याचे जाणवले होते. परंतु त्याने त्या विचित्र वस्तूचे फोटो वॉशिंगटन विद्यापीठातील बर्क संग्रहालयात पाठवले तेव्हा तिथिल तज्ज्ञांनी सांगितले की, ती विचित्र वस्तू जवळपास 13000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर आढळणारऱ्या  'वुली मेमोथ' प्राण्याचा दात आहे. 

 

तज्ज्ञांनी सांगितले की, 1300 हजार वर्षांपूर्वी वुली मेमोथ हा विशालकाय प्राणी हत्तीसारखा दिसत होता. या विशालकाय प्राण्याची उंची जवळपास 12 फूट आणि त्याचे पोट 16 फूट रुंद होते.

 

बातम्या आणखी आहेत...