political / आठ खासदारांची तिकिटे कापणे युतीच्या पथ्यावर, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र ‘भाकरी फिरवणे’ पडले महागात

२०१९ मध्ये फटका बसू शकताे हे लक्षात आल्यामुळे भाजपने सात तर शिवसेेनेने एका खासदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली

विशेष प्रतिनिधी

May 25,2019 06:28:53 PM IST

औरंगाबाद - २०१४ मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युतीचे ४२ उमेदवार निवडून आले. मात्र ५ वर्षात ते प्रभाव टाकू शकले नाहीत, किंवा काही वादग्रस्त कारणांमुळे अडचणीत आले. त्याचा २०१९ मध्ये फटका बसू शकताे हे लक्षात आल्यामुळे भाजपने सात तर शिवसेेनेने एका खासदारांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. या सर्वच ठिकाणी नवे उमेदवार निवडून आणण्यात युतीला यश आले. राष्ट्रवादीनेही मात्र माढा व भंडारात तर काॅंग्रेसने हिंगाेलीत खासदारांचे तिकीट कापले, मात्र हे तिन्ही मतदारसंघ त्यांना गमवावे लागले.

> माढा : खासदार विजयसिंह माेहिते यांनी भाजपशी जवळीक साधल्याने राष्ट्रवादीने यंदा संजयमामा शिंदे यांना उमेदवारी दिली. मात्र ते पराभूत झाले.

> भंडारा : २०१८ पाेटनिवडणुकीत विजयी झालेले मधुकर कुकडे यांना २०१९ मध्ये राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली. नाना पंचबुद्धे यांना तिकीट दिले. मात्र ते भाजपकडून पराभूत.


> हिंगाेली : माेदी लाटेतही काँग्रेसचे जे दाेन खासदार विजयी झाले त्यापैकी एक राजीव सातव. यंदा त्यांना पक्षाने गुजरातमध्ये संघटनेचे काम दिले. व भाजपमधून आयात केलेले सुभाष वानखेडे यांना हिंगाेलीत तिकीट दिले. मात्र तेही शिवसेनेकडून पराभूत झाले.

X
COMMENT