आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेमेतरामध्ये अनियंत्रित झालेली कार तलावात पडली, पाण्यात बुडून एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत्यू झालेल्यांमध्ये चार महिलांसहित एक 6 महिन्यांच्या बाळाचा समावेश

बेमेतरा(छत्तीसगड)- येथे गुरुवारी रात्री एक अनियंत्रित झालेली कार तलावात पडल्याने 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये चार महिलांसहित एक 6 महिन्यांची मुलगीदेखील होती. मृत्यू झालेले सर्व एकाच कुटुंबातील होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, कार बाबा मोहतरा परिसरातून बेमेतराकडे जात होती. यावेळी ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने कार थेट तलावात पडली. तलावाची खोली जास्त असल्याने 8 जणांचा जागीच बुडून मृत्यू झाला.

लोकांनी कार बाहेर काढली
 
स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली आणि दोरीच्या सहय्याने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. टीआय राजेश मिश्रादेखील घटनास्थळी उपस्थित होते. उपस्थित नागरिक कार बाहेर काढण्यास अपयशी ठरल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने कारला बाहेर काढण्यात आले. आठही जणांना रुग्णालयाद नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.