आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रतील 'तितली' वादळात अाठ जण ठार, शेकडो जखमी; वीज-मोबाइल सेवा ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम- 'तितली' वादळाने गुरुवारी ताशी १४० ते १५० किमी वेगाने उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर पलासा भाग ओलांडला. वादळामुळे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात पाच आणि विजयनगरम जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शेकडो जण जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

 

अधिकाऱ्यांनुसार, श्रीकाकुलम आणि विजयनगरममध्ये वादळ आणि मुसळधार पावसामुळे दोन हजार विजेचे खांब पडले आहेत. यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. मोबाइल आणि लँडलाइन फोनही ठप्प झाले आहेत. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त बी. पी. सेठी यांनी सांगितले की, राज्याच्या गंजम व गजपती जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला आहे.


विशाखपट्टणमहून निघालेल्या सात मच्छीमार बोटी बेपत्ता, शाेध सुरू
1 आंध्र-ओडिशा सीमेवर बससेवा बंद करण्यात आली आहे. सहा रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. वादळामुळे रेल्वेस्थानकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशाखापट्टणम येथे समुद्रात गेलेल्या सात मच्छीमारी बोटी बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.
2 ओडिशात एनडीआरएफच्या १३ पथकांसह ओडिशा रॅपिड अॅक्शन फोर्स दल तैनात करण्यात आले आहे. पूर्वेकडील किनारपट्टीवरून तीन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालये शुक्रवारपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...