आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्ह्यात आठ वर्षांची बिबट्याची मादी जेरबंद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भगूर, देवळाली कॅम्प, राहुरी, दोनवाडे या परिसरात सध्या बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने वांरवार बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. स्थानिकांनी वनविभागाकडे बिबट्टयाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी पिंजरा लावला होता. 


गुरुवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षाची मादी बिबट्या या पिंजऱ्यामध्ये जेरंबद व दारणा काठ च्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (ता.२१) पहाटे पाच वाजेच्या सुमारास झाला. पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर बिबटच्या डरकाळीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली, तेव्हा बिबट पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमध्ये समाधान दिसुन येत होते. तर त्याच परिसरात नर बिबट दिसत असल्याचेही नागरिकांनी यावेळी सांगितले. वनविभागाने त्वरीत जेरबंद करण्याची मागणी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे केली आहे. 

बिबट्या जेरबंद झाल्यानंतर लोखंडी पिंजऱ्याला धडक देऊन जखमी होत असल्याने वनविभागाने आता फायबरचे पिंजरे तयार केले आहे. यामध्ये बिबट्या जखमी होण्याचे प्रमाण कमी आहे. फायबर पिंजऱ्याचे वजन कमी असल्याने हाताळण्यासाठी उपयोगी ठरत आहे.बातम्या आणखी आहेत...