आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ : पुरात विद्यार्थ्यांच्या नोट्स झाल्या खराब; आठवी, नववीची मुले सुटीच्या दिवशी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोट्स करताहेत तयार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम- ऑगस्ट महिन्यात केरळात आलेल्या पुराचा फटका अद्याप तेथील लोकांना बसत आहे. आगामी ४ ते ५ महिन्यांत तेथे परीक्षा होणार आहेत. शालेय स्तरावर परीक्षांतून मुलांना काही प्रमाणात सूट दिली जाऊ शकते. पण दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे. पुरामुळे विद्यार्थ्यांच्या नोट्स पूर्णपणे खराब झाल्य आहेत. आता अतिशय कमी वेळेत सर्व विषयांच्या नोट्स नव्याने तयार करणे आणि त्यांचा अभ्यास करणे खूपच अवघड आहे. इतर जिल्ह्यातील ज्युनियर विद्यार्थीही मदतीला समोर येत आहेत. राज्यात ज्या भागात पुराचा कमी फटका बसला तेथील आठवी, नववीचे विद्यार्थी दहावीच्या नोट्स तयार करून पूरग्रस्त भागात पाठवत आहेत. 


तिरुवनंतपुरममधील ख्रिश्चन संस्था लॅटिन आर्चडायोसिसच्या वतीने हा उपक्रम सध्या राबवला जात आहे. विविध शाळांतील २०० पेक्षा अधिक मुलांना या उपक्रमाशी जोडण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी तासिका संपल्यानंतरही शाळेत थांबत असून सुटीच्या दिवशीही शाळेत येतात. विद्यार्थी सध्या दहावीच्या वेगवेगळ्या विषयांचे नोट्स तयार करत आहेत. शिक्षक त्यांना तोंडी सांगून नोट्स लिहिण्यासाठी सांगतात. आतापर्यंत तयार झालेले नोट्स आलप्पुझा आणि कोच्चीला पाठवण्यात आले. वास्तविक पाहता पूरग्रस्त भागात जाऊन मदत करण्याची मुलांची इच्छा होती. पण ते लहान असल्याने तेथे जाऊ शकत नाहीत. पण नोट्सची मदत करून ते आपले कर्तव्य निभावत असल्याचे शिक्षक म्हणतात. यापुढेही नोट्स तयार करून विविध भागात पाठवले जातील, असे शिक्षकांनी सांगितले.


सुटीच्या दिवशीही नोट्स लिहिण्यासाठी शाळेत 
फादर डायसन म्हणाले की, ‘या मोहिमेतून एकीकडे मुलांना मदत दिली जात आहे व दुसरीकडे इतर विद्यार्थ्यांना मदत करण्याचे समाधान आणि शिकवण मिळत आहे. फोटो कॉपी करूनही नोट्स वितरित केल्या जाऊ शकतात. पण मुलांमध्ये मदतीची भावना निर्माण होण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. पूरग्रस्त भागात मदतीची संधी मिळाल्याने मुले सुटीच्या दिवशीही शाळेत नोट्स लिहीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...