आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायफाइडमधून नुकताच बरा झालेल्या एजाज खानची 'तारा फ्रॉम सतारा'मध्ये एन्ट्री, साकारणार जजची भूमिका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः लोकप्रिय कलाकार एजाज खानने नुकतेच 'तारा फ्रॉम सतारा' मालिकेत एंट्री केली आहे. त्याने आमच्या प्रतिनिधी किरण जैनसोबत या मालिकेच्या अनेक पैलूंवर चर्चा केली...

  • मी द्विधा मनस्थिती होतो

मला जेव्हा या शोची ऑफर आली तेव्हा मी द्विधा मनस्थिती होतो, हे पात्र करू की नाही याचा विचार करत होतो. खरं तर, मी एक डान्सर आहे, त्यामुळे शोची संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे या शोच्या कथेत खूपच गुंतागुंत आहे. लेखक आणि निर्मात्यांनी कथेसाठी खूपच मेहनत घेतल्याचे मला वाटते. टीव्हीवर ही एक नवीन संकल्पना येत आहे. मला आनंद वाटतोय की, मी या मालिकेच्या माध्यमातून उपेंद्र लिमये आणि अमिता खोपकर सारख्या वरिष्ठ कलाकारांसोबत काम करत आहे.

  • मी पहिल्यांदाच युवा प्रतिभा लाइव्ह परफॉर्मन्स करताना पाहणार आहे. मला याबद्दल फार उत्सुकता आहे

शोमध्ये बरीच युवा प्रतिभा आहे. मी त्यांना शोमध्ये परफॉर्म करताना पाहिले आहे. मी त्यांना लाइव्ह परफॉर्म करताना पाहणार आहे आणि मी याबद्दल खूप उत्साही आहे. परीक्षक म्हणून माझी भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा माझी भूमिका निष्पक्ष असणार अाहे. मी यात (शत्रुघ्न मेहरा)ची भूमिका साकारत अाहे. मला सर्व कलाकारांचा प्रवास पहायचा आहे आणि ते काय साध्य करतात त्याचा साक्षीदार व्हायचे आहे.

  • मी स्वतः एक डान्सर आहे

मी मालिकेत खूपच मस्ती धमाल करत असतो. मी आतापर्यंत जितक्या भूमिका केल्या. त्या व्यक्तिमत्त्वानुसार वाढवण्याचा प्रयत्न केला. हे माझ्या आतील डान्सरला बाहेर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मी कधीच कोणत्याही शोमध्ये डान्सर आणि काेरिअोग्राफर म्हणून काम केले नाही. मी स्वत: एक डान्सर म्हणून सादरीकरणाला तयार असतो. मी माझी कला वेगवेगळ्या शोमध्ये दाखवली आहे. या शोच्या माध्यमातून माझे पात्र नेमके काय करणार आहे, हे मी पाहणार आहे. हे पात्र खूपच मजबूत आहे. त्याच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात. खरं तर, सध्या मी नुकताच टायफायडमधून उठलो आहे, त्यामुळे कसे होईल ते मलाच माहीत नाही. मात्र मी ठरवले की, शोच्या मंचावर आणि इतर स्पर्धकांसोबत भरपूर मस्ती करायचे ठरवले आहे. यातून नवीन अनुभव मिळणार आहे. 

  • वेगळा अनुभनव

भारतीय टेलिव्हिजनवर अशा प्रकारची मालिका पहिल्यांदाच आली आहे. मी यात काम करण्यासाठी उत्सुक आहे. यातून नवीन अनुभव मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...