आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एक लड़की को देखा तो ऐसा लगा\' चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दाखविली आहे आगळ्या-वेगळ्या प्रेमाची गोष्ट, समोर येणार स्वीटीचे सीक्रेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा अपकमिंग चित्रपट 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा' चा ट्रेलर गुरुवारी रिलीज झाला. चित्रपटात अनिल कपूर मुलगी सोनमसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करत आहेत. यामध्ये रियल लाइफ वडील मुलीचा रोल प्ले केला आहे. ही एक अशी लव स्टोरी आहे, ज्याबद्दल ट्रेलरमध्येच खूप काही दाखवले गेले आहे. सोनम लहानपानापासूनच आपल्या लग्नाचे स्वप्न पाहत असते. अनिल कपूरला वाटते की त्यांची मुलगी स्वीटीचे लग्न एखाद्या चांगल्या मुलासोबत व्हावे पण असे होत नाही. यादरम्यानच गोष्टीत पुढे एक ट्विस्ट येतो. एक रहस्य असते जे सोनम सर्वांपासून लपवते.  त्यामुळे ट्रेलरमध्ये इमोशनसोबतच सस्पेंससुद्धा निर्माण होतो.

ट्रेलरच्या सुरुवातीला राजकुमार राव एक थिएटर प्ले रायटर म्हणून समोर येतो. त्याच्या नाटकाचे टायटलाच असते, 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा'. ट्रेलरमध्ये अनिल कपूर आणि त्याची फॅमिली आपल्या मुलीच्या (स्वीटी) लग्नासाठी अनेक स्थळे पाहतात आणि ट्रेलर संपताना हे दिसते की सोनम का लग्नाचे नाव ऐकताच एकटी का भडकते. राजकुमार राव चित्रपटात सोनम कपूरचा मित्र दाखवला आहे, ज्याला सोनमचे एक मोठे रहस्य महित असते आणि त्याला ते स्वतः सोनमनेच सांगितलेले असते. शेवटी ही बाब संपूर्ण कुटुंबासमोर येते. 

चित्रपटाच्या गाण्याच्या ओळीतून घेतले आहे टाइटल...
चित्रपटाचे टाइटल 1994 मध्ये आलेला अनिल कपूरचा चित्रपट '1942 : अ लव स्टोरी' मधील एका गाण्यातून घेतले आहे. शैली चोप्रा धरच्या डायरेक्शनमध्ये बनणाऱ्या या चित्रपटाचे प्रोडक्शन विधु विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी करत आहेत. चित्रपटात जूही चावलादेखील आहे. चित्रपट पुढच्यावर्षी 1 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...