आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या, नाही उत्तर दिलं तरी चालेल', उमेदवारी मिळणार नसल्याचे खडसेंनी दिले संकेत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भारतीय जनता पक्षाने आपल्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर केल्या आहेत. या दोन्ही यादीत पक्षाने आपल्या काही दिग्गत नेत्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाहीये. त्यापैकी एक मोठं नाव म्हणजे एकनाथ खडसे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर दुसऱ्या यादीत नाव येईल, अशी खडसेंची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना होती. पण, दुसऱ्या यादीतही नाव न आल्याने खडसे नाराज झाले आहेत. भाजप आता त्यांना उमेदवारी देणार का त्यांच्या मुलीला हे अद्याप गुलदस्त्यात आहे. भाजपच्या या निर्णयामुळे खडसे यांच्या समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.खडसेंच्या समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी एका कार्यकर्त्याने उमेदवारी न मिळाल्यास अंगावर रॉकेल ओतून आत्महदन करेन असे सांगितले. पण, खडसेंनी त्याला फोनवरुन समजावून सांगितल्यानंतर तो शांत झाला. "एकनाथ खडसे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी. आतापर्यंत पक्षाचं खूप ऐकलं. स्वत:च्या राजकारणासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचे परिणाम भोगावे लागतील", असा आक्रमक इशारा खडसे समर्थकांनी दिला.

काय म्हणाले खडसे ?
"तुम्ही 3 दिवसांपासून इथे आहात. आपण सर्वजण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपण पक्षाच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहे. मला स्वत: मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितला, तेव्हा एका मिनिटात राजीनामा दिला. पक्षाने मंत्रिपद दिले, पक्षाने आदेश दिला मंत्रिपद सोडले. त्यामुळे, आपल्या भावना स्वाभाविक आहे. गेली 30 वर्ष तुम्ही मला निवडून देत आहात. भाजपचे अस्तित्व इथे नव्हतेच, अशा परिस्थितीत तुमच्या सहकार्याने पक्ष वाढला. एखादा विषय आपल्या आकलनाच्या पलिकडचा असतो. पक्षाने मला सांगितले तुम्हाला तिकीट देणार नाही, तुमच्याऐवजी कुणाला द्यायचे हे तुम्ही सांगा. त्यावर मी सांगितले की आपण काही सांगू शकणार नाही, कारण माझे सारे कार्यकर्ते हे एकनाथ खडसे आहेत. "मी का नको या सोप्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर माझं समाधान होईल, नाही उत्तर दिलं तरी चालेल." मी काही इतका मोठा माणूस नाही की पक्षाला काही विचारू शकेन. जो काही पक्ष निर्णय घेईल, तो आपण मान्य करु. शांतता ठेवा." असी प्रतिक्रीया खडसेंनी व्यक्त केली.
 

बातम्या आणखी आहेत...