आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची, आता नाही; एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - कॉँग्रेसच्या काळात दणका मारताच कामे व्हायची. आता आपलेच सरकार असूनही कामे होत नाहीत. रस्ते खराब झाले असून जनता आमच्याकडे विचारणा करते. सरकार काही करत नसेल तर आता आपण श्रमदानाने कामे करू. यासाठी मी हाती घमेले घेतो. हरिभाऊ आपण फावडे घ्यावे. आपण श्रमदान करून रस्ते सुधारू, अशा मार्मिक शब्दात भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यातील भाजप सरकारला घरचा आहेर दिला.

 

शनिवारी तालुक्यातील रमजीपूर येथे पाल-केऱ्हाळे व विवरे-वाघोदा गटातील बूथ समिती सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख तसेच कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी माजी मंत्री खडसे अध्यक्षस्थानी, तर खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, भाजप जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांची उपस्थिती होती. या वेळी खडसेंनी राज्य सरकारवर मार्मिक शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले, आपण पालकमंत्री असताना कामे सांगण्याची गरज नव्हती. सर्व कामे वेळेत व्हायची. आता कुठलीही कामे होत नसल्याने जनता आक्रोश करत आहे. आज ना उद्या काम होतील ही भावना ठेवून पक्षाला मतदान करत आहे. गेल्या वेळी अहिरवाडी रस्त्यावरून नागरिकांनी आमदार हरिभाऊंना जाब विचारला होता. यानंतर हरिभाऊ उद्विग्न होऊन मुख्यमंत्र्यांना दोनदा-तीनदा भेटले. एकदा माझ्यासमोर पण भेटले. मात्र, सरकारकडे पैसे नसल्याचे सांगून कामे होत नाही, अशी खंत खडसे यांनी या वेळी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...