Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Eknath Khadse and Raksha Khadse Loksabha Election News updates

सुनबाईसाठी सासरेबुवांची धडपड..राजकीय दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ खडसे पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 13, 2019, 04:44 PM IST

कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ खडसे हे सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत.

 • Eknath Khadse and Raksha Khadse Loksabha Election News updates

  भुसावळ- रावेर लोकसभा मतदारसंघावर माजी मंत्री तथा भाजपचे नेते एकनाथ खडसेंचा प्रभाव आहे. त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. उमेदवारी यादी अद्याप जाहीर झालेली नाही. कोणताही राजकीय दगाफटका होऊ नये म्हणून एकनाथ खडसे हे सातत्याने पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात आहेत.

  खासदार रक्षा खडसे यांनी चोपडा विधानसभा मतदारसंघात मंगळवारी 13 गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या कोपरा बैठका घेतल्या. पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद पाठीशी असावा म्हणून शनिवारी (दि.9) त्यांनी भोकरदन येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दावने यांची भेट घेऊन 'समर्पण' कार्यवृत्तांत भेट दिला. याच दिवशी मलकापूर येथे पाच हजार बूथप्रमुख व पेज प्रमुखांची आढावा बैठक घेतली. 10 मार्च रोजी जामनेर येथेही असाच मेळावा घेण्यात आला. सोमवारी (दि.11) दिवसभर मुक्ताईनगरातील जनसंपर्क कार्यालयात बसून त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून मतदारांपर्यंत समर्पण कार्यवृत्तांत पोहोचले किंवा नाही? याची माहिती जाणून घेतली व सूचना दिल्या आहेत

  खडसे मुंबईहून परतले
  भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीच्या बैठकीला मुंबईत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे मंगळवारी सकाळी रेल्वेने भुसावळात पोहोचले.

  आज दोन बैठका..
  बुधवारी (दि.13) मुक्ताईनगरात सकाळी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील व दुपारी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. प्रत्येक गावांत जाऊन संपर्क साधण्याचे व्यापक नियोजन, बूथ रचनेची माहिती, मतदार याद्यांची स्थिती व समर्पण कार्यवृत्तांत घराघरापर्यंत पोहोचवण्याचे व्यापक नियोजन करण्यात आले.

Trending