आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक लढण्याची इच्छा नाही, हेच चित्र राहिल्यास निर्णय घेण्यास सक्षम - एकनाथ खडसे यांचे सूचक विधान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावेर  - पक्षासाठी ४० वर्षे रक्ताचे पाणी केले. राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी आणि मी मेहनत घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. तेव्हा या व्यतिरिक्त पाचवे नाव देखील नव्हते. मात्र, राज्यात सरकार आणूनही मंत्रिपद सोडावे लागले. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता आता निवडणूक लढण्याची अजिबात इच्छा नाही. तरीही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास स्वतंत्र निर्णय घेण्यास मी सक्षम आहे,असा सूचक इशारा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी फैजपुरातील कार्यशाळेत भाजपला दिला. 


दरम्यान, या कार्यशाळेमध्ये खडसे यांनी काँग्रेसने विकास केलाच नाही, असे म्हणता येत नसल्याचे सांगत शिवसेनेला मात्र 'खट्याळ महिले'ची उपमा दिली. जळगाव जिल्ह्यातील फैजपुरात सोमवारी रावेर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षातील शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, गट-गण प्रमुखांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये 'सध्याची राजकीय स्थिती' या विषयावर बोलताना खडसे यांनी पुन्हा मनातील खदखद व्यक्त केली. 


ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण प्रगल्भ असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत वेगळे आहे. कोणत्याही एका माणसाच्या मागे येथील राजकारण जात नाही. आपण शिवसेनेसोबतची युती तोडल्यामुळेच महाराष्ट्रात जास्त जागा मिळून भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. आता शिवसेनेला भाजप सरकारचे काम पसंत नाही तर ते वेगळा निर्णय का घेत नाही? सत्तेत असूनही भाजपला बदनाम करण्यापेक्षा सेनेने सत्ता सोडावी, असे आवाहनही त्यांनी शिवसेनेला केले. 

बातम्या आणखी आहेत...