आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Eknath Khadse Filed Two Nomination Papers, One From The BJP And The Other From The Independent

एकनाथ खडसेंनी दाखल केले दोन उमेदवारी अर्ज, एक भाजपकडून तर दुसरा अपक्ष

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत 125 जणांची नावे जारी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील- कोथरुड, अतुल भोसले- कराड दक्षिण तर शिवेंद्रराजे भोसले यांना जावळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या पहिल्या यादीत पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसेंचे नाव नाहीये. भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली. पण, यात पक्षाचे दिग्दज नेते एकनाथ खडसेंचे नाव यादीत नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाव न आल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त केली. खडसे म्हणाले की, "यादीत नाव असो की नसो, याबाबत चिंता नाही. पुढील यादीत माझे नाव असेल...पक्षासाठी 42 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले व यापुढेही पक्षात राहून काम करीत राहणार. पहिल्या यादीत माझे नाव नाही, यात माझा काय गुन्हा? माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे." यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का? असा प्रश्न विचारला. दरम्यान, खडसे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात एक भाजपतर्फे तर एक अपक्ष अर्ज होता.  "25 वर्षे झाली, मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर मोठ्या नेत्यांसोबत मिळून आम्ही निर्णय घ्यायचो. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असेल किंवा भाजपने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता या गोष्टीला फक्त 'कालाय तस्मै नमः' असं म्हणता येईल."खडसेंचे विरोधक भाजपच्या शक्तिप्रदर्शनात
एकीकडे खडेसंनी उमेदवारी यादीत नाव नसतानाही एकट्याने जाऊन अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे अनेकवेळा आपल्या भाषणातून खडेंचा विरोध करणारे शिवसेनेचे त्यांचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांना गिरीश महाजन आपल्या जवळ करत असल्याचे दिसत आहे.  रावेर मतदारसंघासाठी हरिभाऊ जावळे यांचा अर्ज दाखल करायचा होता. त्यासाठी गिरीश महाजन त्यांच्या शक्ति प्रदर्शनात सामिल झाले होते. यावेळी महाजनांनी आपल्यासोबत खडसेंचे विरोधक चंद्रकांत पाटलांना घेतले. आपल्या पक्षातील जेष्ट नेत्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी न जाता, त्यांच्या विरोधकाला जवळ घेतल्याने अनेर प्रश्न उपस्थित होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...