आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही लोकांकडून सातत्याने अपमान, अन्याय होत राहिल्यास वेगळा विचार करणार -खडसे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची नाराजी काही दूर झालेली नाही. याच मुद्द्यावर एकनाथ खडसे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शनिवारी चर्चा झाली. परंतु, या चर्चेतून बाहेर येताच खडसेंनी मोठे विधान केले आहे. ओबीसी नेत्यांचे भाजपला मोठे करण्यात मोलाचे योगदान आहे. तरीही काही लोकांकडून सातत्याने अपमान केला जात आहे. असाच अन्याय आणि अत्याचार होत राहिल्यास वेगळा विचार करणार असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक जळगावात पार पडली. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात आणखी चर्चा झाली. याच चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपण नाराज नाही असा दावा केला. "मी पक्षावर नाराज नाही. परंतु, पक्षांतर्गत होणाऱ्या कुरघोड्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत. तेच पुरावे मी भाजपला दाखवणार आहे." असा गौप्यस्फोट खडसेंनी केला. भाजपने विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले नाही. त्यानंतर त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले. परंतु, पक्षातील अंतर्गत लोकांनीच मुलीचा पराभव केला असे आरोप खडसे लावत आहेत. एवढेच नव्हे, तर भाजपच्या इतर नाराज नेत्यांसह ओबीसी नेत्यांची मोठ बांधण्याची तयारी सध्या एकनाथ खडसे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असे असतानाच खडसेंनी चक्क वेगळा विचार करू शकतो असे मोठे विधान करत चर्चांना आणखी हवा दिली.