आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंकजा मुंडे आणि रक्षा खडसेंचा पराभव पक्षातील लोकांमुळेच, एकनाथ खडसेंचा आरोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण

मुंबई- विधानसभा निवडणुकीतून पत्ता कट झाल्यानंतर आणि पक्षाने सत्ता गमावल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. या दरम्यान, परळीतून पराभवाचा सामना पत्काराव लागल्याने पंकजा मुंडेही नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यात पकंजा मुंडेंची विनोद तावडेंनी काल भेट घेतली. जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी मोठ्या मानाने पराभवही पचवावा, ज्यांनी नेतृत्व केले, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असे खडसे म्हणाले. इतकंच नाही तर भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं, असा आरोपही खडसेंनी केला. पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.


जे यशाचं श्रेय घेतात, त्यांनी मोठ्या मानाने पराभवही पचवावा, ज्यांनी नेतृत्व केले, त्यांनी ती जबाबदारी घ्यावी, असे खडसे म्हणाले. इतकंच नाही तर भाजपने ओबीसी नेत्यांना डावललं, एकतर त्यांना तिकीट दिलं नाही आणि ज्यांना तिकीट दिलं त्यांना भाजपमधील गटाने पाडलं, असा आरोपही खडसेंनी केला. पंकजा मुंडेंसोबतच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला.


पक्षाच्या विरोधात कामं करणाऱ्यांची नावे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली आहेत, त्यांनी चौकशी करुन विरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करावी. जे घडले आहे, पक्षामध्ये जी अस्वस्थता आहे ती मी वरिष्ठांना कळवली आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले. तसेच, लोकांनी महायुतीला मतदान केले होते, महायुतीचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता. शिवसेनेला एक-दोन वर्षे मुख्यमंत्रिपद दिले असते, तरी प्रश्न सुटला असता, असे मत खडसेंनी मांडले.
नाराज नेत्यांमध्ये नेकमं काय शिजतयं हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे या चर्चांनी जोर धरला आहे. पंकजांनी 12 डिसेंबरला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर समर्थकांना बोलवले आहे. या मेळाव्यादरम्यान पंकजा मुंडे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.