Home | Maharashtra | Mumbai | eknath khadse news in marathi

माझ्याकडे अनेकांची पुराव्यांसह प्रकरणे, माझ्यासारखी गत होऊ नये म्हणून गप्प

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 03, 2019, 09:44 AM IST

भावनिक झालेले खडसे म्हणाले, गेल्या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही व आरोपही सिद्ध झाले नाहीत

  • eknath khadse news in marathi

    मुंबई - एमआयडीसीच्या जमीन प्रकरणात झालेल्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना माझ्यावर कसलेही पुरावे नसताना केलेल्या आरोपाने मंत्रिपद गेले. माझ्याकडे अनेकांची प्रकरणे पुराव्यांसहित आहेत. परंतु मी ती मांडणार नाही, कारण त्यांची स्थिती माझ्यासारखी होऊ नये. त्यांच्यावर “डाग लागलेला आमदार’ असा कलंक लागू नये, असे त्यांनी सांगितले.


    भावनिक झालेले खडसे म्हणाले, गेल्या ४० वर्षांत मी एकही निवडणूक हरलो नाही व आरोपही सिद्ध झाले नाहीत. मात्र, माझ्यावर झालेल्या आरोपामुळे भ्रष्ट व नालायक आमदार म्हणून माझ्याकडे पाहिले जात आहे. हा आरोप घेऊन मला बाहेर जायचे नाही. विशेष म्हणजे माझ्यावर हे आरोप सभागृहात नव्हे, तर बाहेर करण्यात आले. मी एक इंचही जमीन घेतली नाही तरीही आरोप झाल्यावर झोटिंग समिती नेमली. माझी व कुटुंबीयांची लाचलुचपत व अन्य यंत्रणांनी चौकशी केली. परंतु त्यात काही सिद्ध झाले नाही. माझ्याकडे वडिलोपार्जित जमीन असून जावई एनआरआय असून आमच्याकडे पैशांची कमी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खोटे आरोप केल्याने एखाद्याचे आयुष्य बरबाद होते. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा करणारा कायदा गरजेचा आहे. आपल्या वक्तव्यामुळे जर कोणी दुखावले असेल तर त्यांची माफी मागतो, असेही ते म्हणाले.

Trending