Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Eknath Khadse retreat from second phase of election campaign

एकनाथ खडसे यांची दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारातूनही माघार; शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात, प्रचारात सहभागी नसेल्याचे सांगितले

प्रतिनिधी | Update - Apr 24, 2019, 10:30 AM IST

अमळनेर मारामारीप्रकरणी कारवाई होईल

  • Eknath Khadse retreat from second phase of election campaign

    मुक्ताईनगर - माझ्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये २० दिवस उपचार घेत होतो. डाॅक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने रक्षा खडसे यांची उमेदवारी दाखल करण्याच्या दिवशी उपस्थित राहता आले नाही. आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलो असून २४ किंवा २५ एप्रिलला पुन्हा रुग्णालयात दाखल होणार आहे. यामुळे पुढील टप्प्यातील प्रचारात सहभागी होता येणार नाही, असे भाजपचे स्टार प्रचारक एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.

    अमळनेर मारामारीप्रकरणी कारवाई होईल
    अमळनेर येथे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली होती. “हा प्रकार योग्य नाही. पक्ष त्याचे समर्थन करणार नाही. योग्य निर्णय होईल. जळगाव मतदारसंघात पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवार दिला, असे मी प्रथमच पाहिले, असे खडसे म्हणाले.

Trending