आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंचे तिकीट आम्ही नव्हे तर केंद्रीय समितीनेच कापले होते' : भाजप नेते गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही तासांपूर्वीपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे भाजपचे नेते खडसे व महाजन गुरुवारी संध्याकाळी जळगावात पक्ष बैठकीत हास्यविनोदात रमले होते. - Divya Marathi
काही तासांपूर्वीपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे भाजपचे नेते खडसे व महाजन गुरुवारी संध्याकाळी जळगावात पक्ष बैठकीत हास्यविनोदात रमले होते.

जळगाव : 'एकनाथ खडसे यांचे विधानसभेचे तिकीट मी किंवा देवेंद्र फडणवीस यांनी कापले असा आराेप चुकीच्या माहितीतून हाेत आहे. हा निर्णय भाजप केंद्रीय समितीने घेतला हाेता. खडसेंना कुणीतरी जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करणारी माहिती दिलीय, हा आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न आहे,' असे स्पष्टीकरण भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी गुरुवारी जामनेरमध्ये दिले. मी यासंदर्भात काेणत्याही चाैकशीस किंवा खडसेंशी चर्चा करण्यास मी तयार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी फडणवीस खान्देश दाैऱ्यावर येत असून त्यात ते खडसेंची भेट घेऊन त्यांच्या आक्षेपांबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीत आपले तिकीट कापणे, मुलीचा पराभव यास भाजपमधीलच मंडळी कारणीभूत असल्याचा आराेप खडसे वारंवार करत आले आहेत. बुधवारी तर त्यांनी फडणवीस व महाजन यांची थेट नावे घेतली हाेती. त्याबाबत महाजन म्हणाले, 'खडसेंची माहिती चुकीची आहे. काही लोक आमच्यात भांडणे लावण्याचे उद्याेग करीत आहेत. या प्रकरणाची सखाेल चाैकशी करावी,' असे महाजन म्हणाले.

देवेंद्र आज जळगावात : देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगावात आहेत. ते खडसेंशी यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

खडसे विधिमंडळात : 'भाजपकडून खडसेंची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मी बाेललाे. लवकरच खडसे राज्य विधिमंडळात किंवा दिल्लीत दिसू शकतील,' असा दावा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...