आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुशल पंजाबीच्या मृत्यूमुळे दुःखी एकता कपूरने लिहिले, 'आम्ही हरलो, तू तुझा वेळ नरकात घालवला'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता कुशल पंजाबीच्या अकाली निधनाने चित्रपट आणि टीव्ही निर्माता एकता कपूर दु: खी आहे. एकताने इंस्टाग्रामवर कुशलसाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये एकताने कुशल आणि त्याच्या मुलाचे एक छायाचित्र शेअर केले आहे. फोटो शेअर करुन तिने लिहिले, "मला कळले की आम्ही नैराश्याने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीला कायमचे गमावले, आम्ही हरलो, तुझ्या आत्म्याला शांती मिळो. मला आशा आहे की, तुझे शरीर स्वर्गात आत्म्यास भेटेल, कारण तू नरकात वेळ घालवला आहे.''

कुशलने गळफास घेऊन केली आत्महत्या : गुरुवारी रात्री कुशलने आपल्या  मुंबईतील राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोटही सापडली होती, त्यात कुशलने मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असे सांगितले होते. सोबतच त्याने त्याची संपत्ती आईवडील, बहीण आणि तीन वर्षांच्या मुलाच्या नावी करण्यास सांगितले होते. 

बर्‍याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम: कुशल टीव्ही आणि चित्रपटांच्या जगातील एक प्रसिद्ध नाव होते. त्याने देखो मगर प्यार से, हम तुम,  आसमान से आगे,  इश्क में मरजावां यासह अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. याखेरीज कुशल लक्ष्य, काल, सलाम-ए-इश्क, ए जेंटलमॅन सारख्या चित्रपटांमध्येही दिसला. कुशल 37 वर्षांचा होता.

बातम्या आणखी आहेत...