आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Kasautii Zindagii Kay 2: Ekta Kapoor Make Parth Samthaan And Erica Fernandes 23 Feet Statue Of Love Before Prerna & Anurag Show On Air

'कसौटी जिंदगी की' : इतिहासात पहिल्यांदाच होत आहे टीव्ही शोचं असं प्रमोशन, एकता कपूर 10 शहरांत 'प्रेरणा-अनुराग'चे उभारत आहे 23 फूट उंच स्टॅच्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः टीव्ही क्वीन एकता कपूर तिच्या गाजलेल्या 'कसौटी जिंदगी की' या मालिकेचा रिमेक घेऊन येत आहे. मालिका छोट्या पडद्यावर दाखल होण्यापूर्वी त्याचे प्रमोशन मोठ्या थाटात सुरु आहे. प्रमोशनसाठी तब्बल 10 मोठया शहरांमध्ये KZKStatueOfLove ची मुर्ती लावण्यात येत आहे. ही मुर्ती 23 फूट उंच आहे. मालिकेतील प्रमुख पात्र प्रेरणा आणि अनुराग यांची ही मुर्ती आहे. स्टॅच्युच्या रुपात उभे असलेले कपल प्रेमाची निशाणी असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये प्रेरणा आणि अनुराग रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. मुंबईत वांद्र्यातील कार्टर रोडवर हा उंच स्टॅच्यु उभारण्यात आला आहे. याच्या लाँचिंगला एकता कपूर, ईशा देओल आणि तिचे पती भरत तख्तानी, कोरिओग्राफर धर्मेश, रित्विक धंजानी, आशा नेगी, वत्सल सेठ, इशिता दत्ता (तुनश्री दत्ताची बहन), संजीदा शेख, करणवीर बोहरा, टीजे संधू, करण टेकर, पार्थ समथान, एरिका फर्नांडीज हजर होते.


25 सप्टेंबरपासून सुरु होत आहे शो... 

- मालिकेत प्रेरणा आणि अनुरागची भूमिका एरिका फर्नांडीज आणि पार्थ समथान साकारत असून कोमोलिकाच्या भूमिकेविषयी अद्याप सस्पेन्स बाळगण्यात आला आहे.
- पुर्वीच्या मालिकेत ही भूमिका उर्वशी ढोलकियाने साकारली होती. तर नवीन सीरिजमध्ये या भूमिकेसाठी हिना खानचे नाव समोर आले आहे.
- ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका येत्या 25 सप्टेंबरपासून ऑन एअर होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजता स्टार प्लस वाहिनीवर ही मालिका दाखवली जाणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...