आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कसौटी जिंदगी की\'मध्ये दिसली कोमोलिकाची पहिली झलक, समोर आला प्रोमो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: ड्रामा क्वीन एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की' मालिका सुरु होण्याला आता काही तासच उरले आहेत. 25 सप्टेंबरपासून रात्री 8 वाजता हा शो स्टारप्लसवर ऑनएयर होणार आहे. यापुर्वी एकता कपूरने शोचा एक नवीन प्रोमो लॉन्च केला आहे. या प्रोमोमध्ये अनुराग-प्रेरणाच्या लव्ह स्टोरीची व्हिलेन कोमोलिकाची पहिली झलक दिसली. परंतु या प्रोमोमध्ये कमोलिकाचा बॅक लूक दिसतोय. परंतू सीरियलच्या फर्स्ट पार्टमध्ये उर्वशी ढोलकियाप्रमाणे कोमोलिका यावेळीही केसांसोबत खेळताना दिसतेय. बॅकलेस ब्लाउजमध्ये कोमोलिका खुप ग्लॅमरस दिसतेय. कोमोलिसाची भूमिका हिना खान साराकरणार असा अंदाज लावला जातोय.
यासोबतच प्रोमोमध्ये दाखवण्यात आले की, प्रेरणा आणि अनुरागचे वडील दोघांच्या लग्नाविषयी बोलत आहेत. परंतु अनुरागची आई या लग्नाविरुध्द आहे. त्यांना प्रेरणासारखी मीडल क्लास घरातील मुलगी सुन म्हणून नको आहे. त्यांना सुंदर आणि श्रीमंत सुन हवी आहे. याच काळात कोमोलिकाची एंट्री दाखवण्यात येते. कोमोलिकाचा नवा लुक रिव्हील करत एकता कपूरने लिहिले "ज्या प्रकारे सीरियलच्या टीमने प्रचंड मेहनत केली आहे, ते पाहून आशा करते की, लोकांना कसौटी जिंदगी की शो अवश्य आवडेल." शो सुरु होण्यापुर्वी एकता कपूर बालाजीचे आशीर्वाद घेण्यासाठी तिरुपतीला गेली होती. 


एकताने स्वतः डिझाइन करुन घेतला कमोलिकाचा ड्रेस 
सीरियलच्या पहिल्या सीजनमध्ये कोमोलिकाची भूमिका घराघरात प्रसिध्द झाली होती. या रोलची प्रसिध्द पाहून एकता, कोमोलिकाच्या नवीन व्हर्जनवर खुप लक्ष ठेवतेय. एकताने तिच्या लूकसाठी 7 डिझाइनर्सची ट्रायल घेतली आहे, परंतु तिला कुणाचेही काम आवडले नाही. अखेर ती स्वतः यामध्ये इनवॉल्व झाली. एकताला वाटते की, कोमोलिकाचा लूक इंडो-वेस्टर्न असावा. आता ती आपल्या प्रोडक्शन हाउसच्या डीझाइनरसोबत काम करते आणि छोट्या-छोट्या गोष्टींची माहिती घेत आहे. काही दिवसांपुर्वी एकता कपूरने कोमोलिकाच्या लहेंगा-चोलीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...