Home | TV Guide | Ekta Kapoor Scares Of Ghosts And Flight

हॉरर चित्रपट बनवणाऱ्या एकताला वाटते भुतांची भीती, फ्लाइटच्या उड्डाणालाही घाबरते

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 29, 2019, 11:44 AM IST

हॉररपट, मालिकांची निर्माती एकताला वाटते भूतांची भीती

 • Ekta Kapoor Scares Of Ghosts And Flight

  एकता कपूर, मल्लिका शेरावत आणि तुषार कपूरने नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’च्या एका विशेष भागाची शूटिंग केली आहे. ते आपली आगामी वेब सिरीज ‘बू’चे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये आले होते. तुषार, मल्लिकाशिवाय या सिरीजमध्ये कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. पहिल्यांदाच या शोचेच कलावंत आपल्या वेब सिरीजचे प्रमोशन करताना दिसतील.


  या शोच्या शूटिंगदरम्यान एकता आणि तिच्या संपूर्ण टीमने काही रंजक गोष्टींचा खुलासा केला. बोलता-बोलता एकताने आपण कशाला घाबरतो, हेदेखील सांगितले. एका मुलाखतीत कपिलने एकताला भूतांना घाबरते का असे विचारले असता ती म्हणाली, “मी हॉरर वेब सिरीज व चित्रपट बनवते, परंतु मला स्वत:ला भूतांची भीती वाटते.’


  फ्लाइट्सलाही खूप घाबरते
  या शोमध्ये अर्चना पूरण सिंहनेही खुलासा केला की, एकता फक्त भुतांनाच नव्हे तर फ्लाइट्सलाही खूप घाबरते. अर्चना म्हणाली, ‘एकदा मी एकतासोबत फ्लाइटमध्ये असताना तिने १५-२० मिनिटांसाठी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. ती फ्लाइटच्या उड्डाणाला इतकी घाबरली होती की, तिने मजबुतीने माझे हात पकडले होते. यामुळे तिचे हातही दुखत होते.’

 • Ekta Kapoor Scares Of Ghosts And Flight
 • Ekta Kapoor Scares Of Ghosts And Flight

Trending